नगर जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाच्या संत गतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी केली चिंता व्यक्त – मनामधे कसलीही भीती न बाळगता लस घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

0
257

जामखेड प्रतिनिधी

                          जामखेड न्युज – – – 

  मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी नगर जिल्ह्याच्या कोरोना लसीकरणाच्या संत गती बद्दल केली चिंता व्यक्त जिल्ह्यात लस शिल्लक आसतानाही लोकांमध्ये असणाऱ्या गैरसमजामुळे लसीकरण गती कमी आहे ही बाब चिंताजनक आहे त्यामुळे प्रशासनाने लोकांमधे जनजागृती करून लसीकरण गती वाढवावी व नोव्हेंबर अखेर शंभर टक्के लसीकरण पुर्ण करावे अशा सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत.
                       ADVERTISEMENT  
      मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी सोशल मिडीयावरून नगर जिल्ह्यातील जनतेला लसीकरणाबाबत आवाहन केले आहे. ते म्हणाले की, नगर जिल्ह्यात पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या २४लाख ७५ हजार आहे. म्हणजे ६८ % प्रमाण आहे. तर दुसऱ्या डोस घेतलेल्यांची संख्या ८ लाख ८७ हजार आहे. म्हणजे २४% आहे ही संख्या कमी आहे व चिंता वाढवणारी आहे.
                           ADVERTISEMENT 
सध्या जिल्ह्य़ात १ लाख ५० हजार डोस शिल्लक आहेत. पुर्वी लसीकरण केंद्र ४५० होते ते आता वाढवलेले आहेत.
     जिल्हाधिकारी पुढे बोलताना म्हणाले की, लोकांमधे अनेक गैरसमज आहेत. डोस घेऊनही कोरोना होतो पण टास्क फोर्सच्या मते दोन्ही डोस घेऊन कोरोना झाला तरी मृत्यूचे प्रमाण खुपच कमी आहे. त्यामुळे लसीकरण गरजेचे आहे कदाचित डिसेंबर महिन्यात परत तिसरी लाट येऊ शकते त्यामुळे त्या आगोदर लसीकरण गरजेचे आहे. मनामध्ये कसलीही भीती बाळगता कामा नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here