जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – -( सुदाम वराट)
अतिवृष्टीच्या संकटातून शेतकरी सावरत आसतानाच आता रानडुक्कराच्या उपद्रवामुळे हैराण झाला आहे. शेतात पेरलेली मका व हरभरा पेरणीच्या दिवशीच रानडुक्करांचे कळप येऊन बियाणे फस्त करत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तीन तीन वेळा पेरणी करूनही हाच अनुभव आल्याने आता मका व हरभरा पीकच नको अशी भावना शेतकरी वर्गातून उमठू लागली आहे. शेतच पडिक ठेवलेले बरे अशी भावना शेतकरी वर्गातून वाढीस लागली आहे.
ADVERTISEMENT 

.
डुकराची संख्या झपाट्याने वाढत असून या वर नियंत्रण मिळविणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे ,डुकरांच्या उपद्रवाला कंटाळून शेतकरी शेतात रात्री बे रात्री जागल करून शेताची राखण केली जात आहे मात्र सर्वच शेतकऱ्यांना जागली जाणे शक्य नाही ,दिवसभरातील कामाचा थकवा, वाघाची भीती, व शेतात जाण्यासाठी असलेले खराब रस्ते हे पाहता रात्री ला पुन्हा जागली जाणे शक्य नाही मात्र डुकरे या पिकावर ताव मारून मोकळे होत आहे.
ADVERTISEMENT

खरीप हंगामात भुईमूग पीक शिवारात रानडुक्करांनी कोठेही ठेवले नाही. मूग व बाजरी पिकांचीही मोठ्या प्रमाणावर नासाडी करत होते अनेकांनी रात्र रात्र राखण करत पिके जगवली एखाद्या दिवशी जर राखणीसाठी कोणी नसेल तर पंचवीस ते चाळीस डुक्करांचा कळप येऊन पीक फस्त करत होते. अतिवृष्टीने आगोदरच हैराण यातच रानडुक्करांचा उपद्रव यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे.
अतिवृष्टीमुळे अनेक शेतात पाणी होते ज्वारी पेरणीचा हंगाम संपल्याने आता मका हरभरा पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल होता पण हरभरा व मका पीक पेरणीच्या दिवशी रानडुक्करांचा कळप शेतात घुसून बियाणे फस्त करतात अनेकांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली तरीही पेरणी दिवशीच रानडुक्करे शेतात घुसून बियाणे फस्त करत आहेत. यामुळे खत व बियाणांचा खर्च आता परवडत नाही त्यामुळे शेत पडिक ठेवलेले बरे अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली दिसते.
उभ्या पिकांचेही रानडुक्करे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. वनविभागाने ताबडतोब रानडुक्करांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. रानडुक्करांनी नुकसान केलेल्या पिकांचा पंचनामा करायचे ठरले तर जामखेडला वनविभागाचे आॅफिस नाही. कर्जत ला कळवावे लागते मग अधिकारी येतात पंचनामे होतात त्यासाठी फोटा काढावे लागतात फोटो धुवून आणणे कर्जतला प्रस्ताव देणे खर्च हजार दिड हजार येतो नुकसान भरपाई पाचशे ते हजार रुपये मिळते त्यामुळे कोणी शेतकरी पंचनामे करण्याच्या भानगडीत पडत नाही.
वनविभागाने ताबडतोब रानडुक्करांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.