जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट )
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदी देवीदास घोडेचोर यांची नियुक्ती होताच तोट्यात असलेली बाजार समिती सहा महिन्यात विक्रमी उत्पन्न होऊन सव्वा कोटी नफ्यात आली यासाठी त्यांनी अनावश्यक खर्चाला फाटा, बाजार समितीच्या आवाराबाहेर होणाऱ्या खरेदीवर भरारी पथक नियुक्त करून सेस वसुली व शेतकऱ्यांची नुकसान करणारी पसा पध्दत बंद केली यामुळे तोट्यातील बाजार समिती सहा महिन्यात ( अर्थीक वर्ष २०२०-२१) सव्वा कोटी नफ्यात आली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करते त्यासाठी शेतकऱ्यांना सुविधा द्याव्या लागतात. परंतु येथील बाजार समितीत या सर्व घटकाचा अभाव आहे. त्यामुळे शेतकरी बाजार समितीला विसरून गेला आहे. सत्तेवर कोणीही येवो तो स्वताचे हित पाहण्यात मग्न असतो असे आत्तापर्यंत पहायला मिळाले.
ADVERTISEMENT 

मागील सत्ताधाऱ्यांची मुदत १५ सप्टेंबर २०२० रोजी संपल्यानंतर दुसर्याच दिवशी प्रशासक म्हणून येथील सहाय्यक निबंधक ( सहकार) यांनी पदभार घेताच कठोर नियमावली राबवून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले. संचालक मंडळ सत्तेत असताना होणारा अनावश्यक खर्चाला पूर्ण फाटा दिला चहा व्यतिरिक्त कोणताच खर्च नाही. बाजार समितीचा उत्पन्नाचे मुख्य स्तोत्र म्हणजे व्यापा-यांनी शेतकऱ्यांचा खरेदी केलेल्या मालावर असणारा सेस हा वाढवण्यासाठी प्रशासक देवीदास घोडेचोर यांनी प्रयत्न केले तसेच आठवडे बाजार उत्पन्न व गाळेधारकांकडून थकीत वसुली आदी बाबीवर लक्ष केंद्रित केले.
बाजार समितीच्या आवाराबाहेर शहर व तालुक्यात शेतकऱ्यांचा माल काही आडत व्यावसायिक खरेदी करीत होते पण त्याचा सेस भरला जात नव्हता. त्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती प्रशासकाने करून जे आडत व्यापारी म्हणून व्यवसाय करणाऱ्या वर शेतकऱ्यांचा माल खरेदी केलेली नोंदी तपासणी करून त्यांच्याकडून बुडीत सेस वसुल केला यामुळे बाजार समितीचे सहा महिन्यात २ कोटी ३६ लाख उत्पन्न झाले व बाजार समितीने तोटा भरून काढून व इतर देणी व कर अदा करून १ कोटी १८ लाख नफ्यात आली.
ADVERTISEMENT

पसा पध्दत बंद
– – – – – – – – – – – – – – – – –
प्रशासक घोडेचोर यांनी बाजार समितीत चालणारी पसा पध्दत बंद केली. पसा म्हणजे शेतमाल व्यापारी अडतीवर आल्यावर शेतमाल उतरून घेणे, पोत्यात भरणे, बारदाणा व्यवस्थित ठेवणारे खाजगी मजुर या कामाच्या बदल्यात एक ते दोन किलो धान्य पोत्यामागे काढून घेत होते. ही पध्दत म्हणजे पसा पध्दत होय या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते ही पसा पध्दत बंद करण्याचे धाडस प्रशासकाने करून शेतकऱ्यांना न्याय दिला.
वरीलप्रमाणे काम प्रशासक देवीदास घोडेचोर यांनी करून सहा महिन्यात बाजार समिती नफ्यात आणली तसेच खर्डा येथील उपबाजाराला वॉलकंपाऊंड काम सुरू आहे दुसरे अर्थिक वर्ष २०२१-२२ ला संपेल त्यावेळी आणखी नफा वाढणार आहे. जानेवारी महिन्यात संचालक मंडळ निवडणूक होत असल्याने येणाऱ्या संचालक मंडळाने असाच पारदर्शी कारभार करून व शेतकऱ्यांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून बाजार समिती आपल्या मालकीची आहे याचा प्रत्यय करून देण्याची जबाबदारी नवीन सत्ताधाऱ्यांची आहे.