जामखेड न्युज – – –
आपल्या मार्मिक, खोचक आणि बेधडक वक्तृत्व शैलीने प्रसिद्ध असलेले राज्यातील लोकप्रिय किर्तनकार आणि प्रबोधनकार म्हणून ओळखले जाणारे निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी पुन्हा किर्तनामध्ये आपण कोरोनाची लस घेतली नाही आणि घेणारही नसल्याचं वक्तव्याने वादात आले आहेत
जाहीर कीर्तनात त्यांनी बोलताना, कोरोना झालेल्या लोकांना यम त्रास देणार नाही एवढा त्रास घरच्यांनी दिला आहे. तसेच आपण कोरोनाची लस घेतली नाही आणि घेणारही नसल्याचं वक्तव्य त्यांनी किर्तनात केलं आहे, महाराजांच्या या भूमिकेमुळे ते पुन्हा चर्चेत आले असून त्यांना ट्रोल केले जात आहे. अर्थात इंदोरीकर महाराजांनी हे वक्तव्य स्वतः बाबतीत केले असून तसा सल्ला इतरांना दिला नसल्याचे त्यांच्या एकूण वक्तव्यावरून दिसून येत आहे. मात्र कीर्तनकार हे समाजप्रबोधनाचे काम करत असतात. श्रोते, समर्थक,चाहते किर्तनकारांचे प्रबोधन अनुकरणीय अपेक्षित ठेवतात, त्यामुळे इंदोरीकर महाराजांनी केलेले वक्तव्य एक प्रकारे वादात सापडले आहे.
ADVERTISEMENT 

एकीकडे सरकार सर्व नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करत असतांनाच दुसरीकडे भर कीर्तनात ‘मी कोरोनाची लस घेणार नाही.’ असं वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी केलं आहे. ते लोकनेते स्वर्गीय गोपाळरावजी गुळवे यांच्या 81 व्या जयंती निमित्ताने घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी किर्तना दरम्यान आपल्या खुमासदार शैलीत कोरोना रुग्ण, नातेवाईक आणि लसीकरण यावर भाष्य केले. यावेळी किर्तनास आणि कार्यक्रमास उपस्थितांनी महाराजांच्या या मार्मिक पद्धतीने मांडलेल्या कोरोना विषय आणि त्यांच्या वैयक्तिक भूमिकेला हसत दाद दिली.
ADVERTISEMENT

कोरोना रुग्णांना मानसिक आधार न दिल्याने जास्त लोक मृत्यू पावले असल्याचही ते म्हणाले. तसंच कोरोनाला एकच औषध आहे ते म्हणजे मन खंबीर ठेवा असही इंदोरीकर महाराज यावेळी म्हणाले आहेत.
‘सम-विषय’वरून या पूर्वीही इंदोरीजर महाराज वादग्रस्त-
-इंदोरीकर महाराज या पूर्वीही आपल्या एका वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहिले आहे. स्त्रीसंग सम तारखेला आल्यास मुलगा होतो आणि विषय तारखेला आल्यास मुलगी होते, या त्यांच्या जाहीर किर्तनातील भाष्यामुळे त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारी नंतर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल असून हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.असून सरकार बरोबरच अंधश्रद्धा निर्मूलन समिती उच्च न्यायालयात गेलेल्या आहेत.