जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
जामखेडयेथील कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचा नुकताच वाढदिवस झाला वाढदिवसानिमित्त पंचायत समिती मध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते तसेच वाढदिवसानिमित्त ज्यांनी – ज्यांनी सत्कार केला त्यांना एक एक फळझाडाचे रोपटे देण्यात आले सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व इतर मित्र मंडळी यांना दिलेले रोपटे संत ज्ञानेश्वर वृद्धाश्रमात लावण्यात आले यावेळी तेथील महाराजांनी सांगितले की या झाडांचे संगोपन करून याची फळे येथिल वृद्धांना खाऊ घालू
ADVERTISEMENT 

गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या ३४ व्या वाढदिवसा निमित्त त्यांनी प्रत्येकाचा सत्कारा वृक्ष देऊन सन्मान केला होता ते वृक्ष सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिलेले झाड़ आपले मित्र योगेश पवार ,प्रवीण मंडलेचा, गणेश देवकाते आणि आंतरवली येथील संत ज्ञानेश्वर माऊली वृद्धाश्रमातील काही वृद्ध वृक्षारोपण केले.
ADVERTISEMENT 

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते म्हणाले जामखेड तालुक्यासाठी सर्व अधिकारी उदाहरणार्थ बी डि ओ प्रकाश पोळ,तहसीलदार योगेश चंद्रे साहेब, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक संजय वाघ या सर्व क्षेत्रात कर्तव्यदक्ष अधिकारी आल्यामुळे जामखेडच्या सर्व कार्यात अडचणी येत नाही माननीय बी डी ओ साहेब यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा कार्यक्रम रक्तदान कॅम्प घेऊन १५१ रक्तदान पिशव्या संकलन केल्या खरोखर सध्या कोरोनामुळे रक्ताची गरज आहे रक्ताची उणीव भासत आहे ही बाब लक्षात घेऊन पोळ साहेबांनी रक्तदान कार्यक्रम घेऊन कार्यक्रमावेळी उपस्थित पाहुण्यांना सत्कारा निमित्त चांगल्या प्रतीचे झाड दिले ते झाड आम्ही आज संत ज्ञानेश्वर माऊली सेवा आश्रम अंतरवली येथील वृद्धाश्रमात लावले आहे यावेळी संजय कोठारी सामाजिक कार्यकर्ते, योगेश पवार तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा, गणेश देवकाते आयसीआय बँक आणि गहीनाथ लोखंडे महाराज वृद्धाश्रमातील वृद्ध उपस्थित होते यावेळी बोलताना लोखंडे महाराज म्हणाले आम्ही या झाडाला मोठे करून येथील वृद्धांना जांभळ खाऊ घालणार आहोत