कर्जत येथील युवा नेते सागर (दादा) पाटील यांनी त्यांचा 27 वा वाढदिवस केला निवारा बालगृहात साजरा

0
434
जामखेड न्युज – – – – – 
  कर्जत येथील भारतीय राष्ट्रीय युवा परिषद अहमदनगर दक्षिण जिल्हा अध्यक्ष सागर (दादा) पाटील यांनी त्यांचा 27 वा वाढदिवस इतर ठिकाणी साजरा न करता निवारा बालगृहातील अनाथ, निराधार मुलांना एक दिवसाचे गोड जेवण व पंधरा दिवस पुरेल एवढा किराणा, धान्य देऊन साजरा करण्यात आला.
      ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह मोहा फाटा (समता भूमी) ता- जामखेड जि-अहमदनगर या ठिकाणी अनाथ,निराधार ,वंचित, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार,  लोककलावंत,व भटके-विमुक्त दलित आदिवासी या घटकातील 71 मुला-मुलांच्या शिक्षणासाठी हा प्रकल्प गेली 2015 पासून लोकवर्गणीतून चालवला जात असून या प्रकल्पाला शासनाची कोणतीही मदत मिळत नाही.
        तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांचे बालगृहातील मुलांनी स्वागत गीत गाऊन स्वागत केले व गुलाबपुष्प शाल देऊन त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
       यावेळी सागर (दादा) पाटील बोलताना म्हणाले की मी भारतीय राष्ट्रीय युवा परिषद अहमदनगर दक्षिण जिल्हा अध्यक्ष पदावरती काम करत असल्यामुळे मला संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करावे लागतात, तेव्हा मी अनेक  कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या निवारा बालगृहाचे नाव ऐकून होतो, त्यामुळे  मी हा माझा वाढदिवस या बालगृहातील अनाथ, निराधार यांच्या चेहऱ्यावरती हसू फुलविण्यासाठी या ठिकाणी साजरा करण्याचे ठरवले मी जेव्हा या बालगृहात प्रवेश केला तेव्हा मी हे पाहून एकदम आश्चर्यचकित होऊन भारावून गेलो याठिकाणी निर्जीव वस्तूंना देखील बोलके  बनवलेले आहे या बालगृहाची इमारत, परिसर स्वच्छता, पिण्यासाठी फिल्टर युक्त पाणी, व्यवस्थापन या मुलांची शिस्त त्यांच्यामधील कलागुण इत्यादी पाहून मला असे वाटले की हे बालगृह लोकवर्गणीतून व लोकसहभागातून चालवले जात आहे तरी देखील अहमदनगर जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण व आदर्श बालगृह म्हणून शासनाकडे काही दिवसातच या बालगृहाची नोंद केली जाईल.
       तरी माझ्या सर्व मित्र परिवारांना या ठिकाणी भेट देऊन मदतीचे त्यांना आव्हान करणार आहे, व पुढील काळात या बालगृहाला जी काही मदत लागेल ती मला मी निवारा बालगृहाचा सदस्य या नात्याने मला कळवावे.
                                 ADVERTISEMENT
                   
       तसेच या संस्थेचे संस्थापक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी संस्थेची संपूर्ण माहिती सांगून दादांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या तसेच मा. स्वप्निल खाडे, अनिकेत कुलकर्णी यांनीही दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,
   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवारा बालगृहाचे प्रकल्प समन्वयक संतोष चव्हाण सर यांनी केले.
                    ADVERTISEMENT 
     यावेळी महेंद्र पवार, कृष्णा वायकर,  स्वप्निल निंबाळकर, धीरज निंबाळकर,  शितीज वाईकर, बब्रुवान वराळे, मच्छिंद्र जाधव, निवारा बालगृहाचे अधीक्षक वैजीनाथ केसकर, मोरे ताई, व विद्यार्थी उपस्थित होते.
     तसेच आभार निवारा बालगृहाच्या व्यवस्थापिका सौ. संगीता केसकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here