जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते धनराज पवार यांना निर्वाण फाऊंडेशन सामाजिक संस्थेकडून दिला जाणारा २०२१ चा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला होता .
नगर दक्षिणचे खासदार डाँ.सुजय विखे पाटील हे जामखेड दौर्यावर आले असता धनराज पवार यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना विखे म्हणाले , कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल निर्वाण फाउंडेशन या संस्थेनी दिलेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल धनराज पवार यांचे विशेष कौतुक केले आणि पुढील काळात असेच कार्य सुरू ठेवण्याचे आवाहन केले व पुढील कार्यास व वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी मंत्री प्रा. राम शिंदे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात, तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल बोराडे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय वाघ, मुख्याध्याकारी मिनिनाथ दंडवते, सार्वजनिक बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता पालवे, संजय कांबळे, जि.प. सद्स्य सोमनाथ पाचारणे, माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर, कृ.उ.बा.स.सभापती गौतम उतेकर, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सलीम बागवान उपस्थित होते.
याचबरोबर अँड. प्रविण सानप, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शरद कार्ले,संचालक मकरंद काशिद, नगरसेवक अमित चिंतामणी, सोमनाथ राळेभात, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, संजय राऊत, मनोज कुलकर्णी, अर्जुन म्हेत्रे, डॉ. अल्ताब शेख, प्रविण चोरडिया, मा. उपसरपंच सुरेश जाधव, अभिजीत राळेभात, शिवकुमार डोंगरे, युवा नेते मोहन देवकाते, डॉ. महेश मासाळ, विक्रांत घायतडक, प्रसिद्धी प्रमुख उध्दव हुलगुंडे, आप्पा ढगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






