जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट )
जामखेड शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद मित्रमंडळ व जगदंबा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ओपन गरबा दांडीया सह विविध सांस्कृतिक कार्यक्रम फनी गेम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यामधे मोठ्या प्रमाणावर महिलांनी सहभाग नोंदविला होता.
शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद मित्रमंडळ व जगदंबा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून नवरात्र उत्सहानंतर येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेस ओपन गरबा दांडीया सह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत आसतात याही वर्षी खर्डा रोडवरील लोहार देवी मंदिर परिसरात ओपन गरबा दांडीया व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी मिना बेलेकर, ज्योती राऊत, अलका काशिद, श्रद्धा जगताप, शितल जगताप, सिंधू संतोष मोहळकर यांच्या सह बेलेकर वस्ती, जगदाळे वस्ती, बोराटे वस्ती, जामखेड शहरातील महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.
प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या पाठीमागे एक यशस्वी स्त्री
असते हीच संकल्पना समोर ठेवून आज सर्वसामान्य सामाज्यातील महिलांना व्यासपीठ उपस्थित होईल असा निर्धार करून सौ. रोहिणी संजय (काका) काशिद तसेच जगदंब प्रतिष्ठान जामखेड यांच्या माध्यमातून कोजागिरी पौर्णिमा निमित्त महिलाना ओपन गरबा दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या महिलांनी काशिद कुटुंब व जगदंबा प्रतिष्ठानचे आभार मानले






