जामखेड न्युज – – –
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत असणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येत असून, नोंदीत व पात्र बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ, राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याचे महसुल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात असून, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री श्री. शंकरराव गडाख असणार आहेत. हा कार्यक्रम 23 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 12 वा. स्काय ब्रिज, भोसले आखाडा, विनायक नगर, बुरुडगाव रोड, अहमदनगर येथील चालु असलेल्या इमारत बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी होणार आहे.
या कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, राज्यमंत्री श्री. प्राजक्त तनपुरे, महापौर सौ. रोहिणीताई शेंडगे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले-पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, सुजय विखे पाटील, उपस्थित असणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य व इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे श्री. नि.कृ.कवले, सहाय्यक कामगार आयुक्त, अहमदनगर यांनी कळविले आहे.






