जामखेड न्युज – – –
श्री संत वामनभाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून साकत फाटा, बीड रोड जामखेड याठिकाणी नवज्योत प्रकल्प सुरू केला असून या प्रकल्पातील वृद्ध व मुलांसमवेत जामखेड मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मा. राजेंद्र कोठारी यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला. या वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना व वृद्धांच्या स्वयंपाकासाठी किराणा, गहू व तांदूळ याची मदत करण्यात आली.
संस्थेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जामखेड शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, कोअर कमिटी सदस्य उमर कुरेशी, जेष्ठ नेते बिभीषन परकड, संजय डोके, तालुका सरचिटणीस प्रकाश काळे, युवा कार्यकर्ते सचिन शिंदे, डॉ. शिंदे साहेब, राहुल आहेर सर, योगेश कदम, बाबासाहेब डोंगरे, विधाते सर, या सर्वांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व माहितीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक संतोष गर्जे यांनी श्री संत वामनभाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रकाश काळे यांनी बोलताना सांगितले की आमचे नेते आदरणीय राजेंद्र कोठारी यांचा वाढदिवस गोरगरिबांना मदत करून करण्याचा योग आज आम्हाला लाभला असून पुढील काळात सर्व उपक्रमांचे आयोजन या प्रकल्पातील वृद्ध व मुलांसमवेत करण्यात येतील.
उमर कुरेशी यांनी बोलताना सांगितले की संस्थेच्या माध्यमातून नव्याने सुरू झालेल्या वृद्धाश्रमासाठी शुभेच्छा देत वाढदिवसाच्या निमित्ताने अन्न धान्य व किराणा मालाची मदत केली असून पुढील काळात वेळोवेळी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
राजेंद्र गोरे यांनी शहरातील इतर कार्यकर्त्यांनी देखील वाढदिवसाला इतरत्र खर्च टाळून अनाथ, निराधार व वृद्धांना मदत करत आश्रमामध्ये वाढदिवस साजरे करण्याचे आवाहन केले.
बापुसाहेब गायकवाड यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देत वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. यावेळी प्रकल्पातील मुले व वृद्ध उपस्थित होते.






