१५ व्या वित्त आयोगातुन साकत गणातील देवदैठण येथे डॉ. भगवानराव मुरुमकर यांच्यातर्फे बसण्यासाठी बाकडे

0
233
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर यांनी साकत गणात १५ व्या वित्त आयोगातुन तिनशे बाकडे बसवलेले आहेत त्यामुळे साकत गणातील प्रत्येक गावात बाकडे आले गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणावर समाधान व्यक्त केले आहे. आता खर्डा गणात बाकडे बसवणार असल्याचे मुरूमकर यांनी सांगितले. मोहा, सावरगाव, शिऊर व नाहुली नंतर आता देवदैठण येथेही बाकडे बसवलेले आहेत त्यामुळे तेथील लोकांनी समाधान व्यक्त करीत डॉ मुरुमकर यांचा सत्कार केला.

काल देवदैठण येथे पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर यांच्या निधीतून लोकांना बसण्यासाठी ठीक ठिकाणी बाकडे बसवण्यात आले

,देवदैठन गावातील लोकांनी मा सभापती भगवान दादा मुरुमकर यांचे आभार मानले उपस्थित देवदैठण ग्रामपंचायत सरपंच  संतोष महारनवर, डाॅ संजय भोरे, डाॅ नगनाथ भोरे, महादेव उगले, पांडुरंग भोरे, अनिरुद्ध धेंडे,  शहाजी सरगर, सतिश सरगर, अविनाश भोरे, अमोल भोरे, बंडु टेलर, लक्ष्मणबाबा भोरे,  सुधीर भोरे,  पांडुरंग महारनवर,  सुभाष धेंडे व देवदैठण ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here