अस्ती पाण्यात विसर्जन न करता शेतात करत कोल्हे कुटुंबीयांनी केले वृक्षारोपण

0
426
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 

तालुक्यातील साकत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या कोल्हेवाडी येथे अनोख्या पध्दतीने वृक्षारोपण करण्यात आले. आजोबांचे रक्षा विसर्जन न करता त्या माध्यमातून आजोबांच्या स्मृती जागरूक ठेवण्यासाठी शेताच्या बांधावर वृक्षारोपण करून केले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

   ग्रामीण भागामध्ये मृत्यूनंतर आत्म्याला शांती मिळावी, या उद्देशाने विविध जुन्या रूढी, परंपरा आजही मानव जातीला अगदी घट्ट चिकटून बसल्या आहेत. मृतदेहाला भडाग्नी दिल्यानंतर उर्वरीत अस्थी आणि रक्षा विसर्जनासाठी परंपरेनुसार विविध तीर्थस्थळावर जाण्याची नातलगांची भावना आहे. कोल्हेवाडी या छोट्याशा गावातील ब्रम्हा कोल्हे यांनी जलप्रदुषणाची समस्या लक्षात घेऊन  पारंपरिक प्रथेला फाटा देत. आजोबाच्या मृत्यूनंतर रक्षा विसर्जन न करता आपल्याच शेतातील बांधावर याच राखेचा उपयोग करून वृक्षारोपण करीत आपल्या आजोबांच आठवण कायम स्मरणात राहील हा उद्देश समाजासमोर ठेवून एक चांगल्या प्रकारचा आदर्श उभा केला आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल ब्रम्हा कोल्हे यांचे कौतुक होत आहे.
      सोमवार दिनांक १८ रोजी कोल्हेवाडी येथिल आबादेव गहिनाथ कोल्हे वय ९५ यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली एक मुलगा सुना नातवंडे असा परिवार आहे. आबादेव कोल्हे हे गावातील समाजकार्यात यात्रा, हगामा, अखंड हरिनाम सप्ताह यामधे आघाडीवर असत अनेक गोरगरीब कुटुंबाला ते मदत करत असत त्यांच्या निधनानंतर कोल्हे कुटुंबांनी अस्ती पाण्यात विसर्जन न करता शेतात विसर्जन करत त्या जागेवर झाडे लावून त्यांच्या स्मृती जतन केल्या आहेत.