जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
आपल्या कामातून ओळख निर्माण करणारे प्रभाग क्रमांक १३ चे नगरसेवक अमितभाऊ चिंतामणी आहेत. जामखेड शहरातील शंभर टक्के क्राॅक्रिटीकरण, शंभर टक्के बंदिस्त गटारे व शंभर टक्के विद्युतीकरण व पाण्याची सोय असणारा प्रभाग १३ आहे हे सर्व कामे अमित चिंतामणी यांनी पाच वर्षांत पुर्ण केलेली आहेत व तिही दर्जेदार त्यामुळे नगरसेवक कसा असावा तर तो अमित चिंतामणी सारखा त्यांनी त्यांची ओळख आपल्या कामातून तयार केली आहे असे मत दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात केले
जामखेड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व युवा नेतृत्व अमित चिंतामणी यांच्या वतीने जामखेड येथे कोजागिरी पौर्णिमा उत्सवा निमित्त ओपन गरबा दांडीया स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम सिने अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर होत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख, तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार राजेशजी मोरे, जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपक देवमाने, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांचे स्वीय सहायक प्रा. अरूण वराट, नगरसेवक बिभिषण धनवडे, पत्रकार अशोक निमोणकर, सागर पवार यांच्या सह अनेक पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, जामखेड मधील लोक नवरात्र उत्सवानंतर कोजागिरी पौर्णिमेची आतुरतेने वाट पाहत असतात कारण अमित चिंतामणी हे हा सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने आयोजित करतात.
अभिनेत्री वेंगुर्लेकर म्हणाल्या की कॅमेरा समोर आम्ही काम करत आसतो तेंव्हा प्रेक्षक समोर नसतात हे जरी खरे असले तरी कलाकार प्रेक्षकांची वाट बघत आसतो कारण कलाकार प्रेक्षकांनशिवाय मोठा होऊ शकत नाही असे मत सिनेअभिनत्री रसिका वेंगुर्लेकर यांनी व्यक्त केले.सध्या कोरोना काळ आसल्याने अनेक शुटींग नाट्य गृह बंद होते मात्र आता कोरोना संकटावर मात करुन सर्व जण पुन्हा सुखी व आनंदी राहु. कलाकाराला सर्वात महत्त्वाचा समोर आसलेला प्रेक्षक महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही समोर आहत त्यामुळे आज मला खुप आनंद होत आहे. तसेच नगरसेवक अमित चिंतामणी करत आसलेल्या कामांचे कैतुक देखील अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांनी केले.
यावेळी बोलताना जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात म्हणाले की, शहरात सर्वात दर्जेदार कामे असणारा प्रभाग अमित चिंतामणी यांचा आहे त्यांनी जसे प्रभागात दर्जेदार कामे केलेली आहेत तसेच कामे नगराध्यक्ष म्हणून संपुर्ण शहरात करण्याची संधी मिळो असे राळेभात यांनी सांगितले. गरबा दांडीयाच्या उत्कृष्ट नियोजनाबाबत राळेभात यांनी चिंतामणी यांचे कौतुक केले.
या नंतर कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक अमित चिंतामणी यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की गेल्या दोन वर्षांत मी माझ्या प्रभागातील विकासकामे पूर्ण केली आहेत. तसेच आनखी प्रभागातील व शहरातील विकास करणार असुन या माध्यमातून महीलांसाठी एक असे ध्येय व संकल्प करुन महीलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर राहील. यानंतर उपस्थित महीला भगीनी व नागरीकांचे अभार देखील अमित चिंतामणी यांनी मानले. या वेळी पत्रकार धनराज पवार यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्या बद्दल कार्यक्रमाचे आयोजक अमित चिंतामणी यांनी पत्रकार धनराज पवार यांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे आभार हभप दिपक महाराज गायकवाड यांनी मानले.






