जामखेड येथिल चांदणझुला कविसंमेलनासाठी राज्यातील नामवंत कवी उपस्थित राहणार – कविसंमेलनात राज्यस्तरीय पत्ररत्न पुरस्कार देण्यात येणार

0
258
जामखेड  प्रतिनिधी
           जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
मराठी साहित्य प्रतिष्ठान जामखेड आयोजित चांदणझुला राज्यस्तरीय कवी संमेलन शनिवारी दि. २३ रोजी जुन्या तहसिल कार्यालयासमोर आयोजित करण्यात आले असून राज्यातील नामवंत कवी उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यक्रमात पत्रकारितेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना राज्यस्तरीय पत्ररत्न पुरस्कार देण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.आ. य पवार यांनी केले आहे.
 येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानचे वतीने शनिवार दि.२३आक्टोबर२०२१रोजी रात्री साडेसात ते दहा या वेळेत नामवंतांचे कविसंमेलन चांदणझुला साजरे होत आहे. बीड, नगर, लातूर, नांदेड, सोलापूर, बारामती, येथील नामवंत कवी, कवयित्रींचा सहभाग असणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब सौदागर (श्रीरामपूर) सत्ताधीश, झुंजार, राजमाता जिजाऊ या चित्रपटाचे गितकार पटकथा लेखक व अभिनेते आहेत तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत चांदगुडे (पुणे) व शंकर वाडेवाले (नांदेड) शालेय व विद्यापीठीय पाठ्यक्रमाचे नामवंत कवी करणार आहेत.
  कार्यक्रमाच्या सुरुवातीला चित्रपट संगीतातील १० मिनिटाचे अनिल अडसुळ यांचे बासरी वादन कार्यक्रम होईल.
    यावेळी जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.चांदणझुला कविसंमेलनाचे हे सहावे वर्ष आहे.कोरोनाचे नियम पाळून चांदणझुला साजरा होत आहे. शालेय व  विद्यापीठीय पाठ्यक्रमाचे मान्यवर कवींचा या कविसंमेलनात सहभाग असून तहसील कार्यालय परिसरात संमेलन होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.आ. य. पवार, उपाध्यक्ष डॉ. विद्या काशिद, कार्याध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, खजिनदार डॉ. जतिन काजळे, सचिव डॉ शत्रुघ्न कदम, कुंडल राळेभात व सर्व सदस्य मराठी साहित्य प्रतिष्ठान यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here