स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त वयोश्री योजनेमार्फत मोफत साहाय्यक साधने वाटप

0
300
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
       भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षानिमि‍त्‍त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी साठ वर्षांवरील सर्व नागरीकांसाठी सुरु केलेल्‍या वयोश्री योजनेचा शुभारंभ खासदार डॉ.सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्‍या नेतृत्‍वाखाली सोमवार दि.१८ ऑक्‍टोंबर २०२१ रोजी करण्‍यात येणार आहे.
       पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशातील साठ वर्षांवरील सर्व जेष्‍ठ  नागरीकांसाठी राष्‍ट्रीय वयोश्री योजना सामाजिक न्‍याय व आधिकारीता मंत्रालयाच्‍या माध्‍यमातून सुरु केली आहे. या माध्‍यमातून मोफत सहाय्यक साधने वाटपासाठी तपासणी शिबीर डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित जिल्‍हा  दिव्‍यांग पुर्नवसन केंद्र व समाज कल्‍याण विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित करण्‍यात आले आहे.
       जामखेड येथील जिल्‍हा परिषद प्राथमि‍क शाळेत दि. १८ व १९ ऑक्‍टोंबर सकाळी ९ ते दुपारी ५ या वेळेत हे तपासणी शिबीर संपन्‍न होणार असून, मंगळवार दिनांक १९ ऑक्‍टोबर २०२१ रोजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील व माजीमंत्री प्रा.राम शिंदे यांच्‍या उपस्थितीत जामखेड तालुक्‍यातील विविध विकास कामांचा शुभारंभ व सदर शिबीरालाही भेट देवून जेष्‍ठ नागरीकांच्‍या समस्‍या जाणून घेणार आहेत.
या शिबीरात येणा-या जेष्‍ठ नागरीकांची तपासणी करण्‍यात येणार असून, यामध्‍ये  चालण्‍याची काठी, कोपर काठी, अल्‍युमिनियम कुबड्या, चार पायाची काठी, तीन पायांची काठी, घडीचे वॉकर, नंबरचा चष्‍मा, कानाचे श्रवण यंत्र, चाकांची घडीची खुर्ची, कृत्रिम दात,कमोड व्‍हील चेअर, कमोड खुर्ची, पायाची काळजीससंच,चालण्‍याची काठी सीठ, संपूर्ण पाठीचा पट्टा, मानेचा पट्टा, पाठीचा पट्टा, गुडघ्‍याचा पट्टा, वॉकर ब्रेक सह साहीत्‍य देण्‍यात येणार आहेत.
यासाठी वार्षिक उत्‍पन्‍न १ लाख ८० हजारांपेक्षा कमी असलेल्‍या जेष्‍ठ  नागरीकांनी आधार कार्ड, रेशनकार्ड झेरॉक्‍स, उत्‍पन्‍नाचा दाखला, दोन पासपोर्ट फोटा ही कागदपत्रे आणण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here