वाहतुक कोंडी टाळण्यासाठी उद्या खर्डा भूम उस्मानाबाद कडे जाणारी वाहतुक पर्यायी मार्गाने वळवली जाणार

0
276
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
  आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतून खर्डा येथिल शिवपट्टण किल्ल्यावर साकारत असलेल्या देशातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकणार आहे त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर गर्दी होणार आहे त्यामुळे खर्डा मार्गी भूम उस्मानाबाद कडे जाणारी वाहतुक जातेगाव फाटा मार्गी वळणावर असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे पोलीस अधीक्षक मनोज पाटील जाहीर केले आहे.
 खर्डा ता. जामखेड येथील शिवपट्टम किल्ल्याशेजारी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार श्री रोहीत पवार यांनी भारतातील सर्वात उंच ७४ मीटर स्वराज
ध्वज हा कार्यक्रम आयोजीत केलेला असुन विविध संत-महंत राजे महाराज यांचे वंशज तसेच संरक्षित व्यक्ती यांचे हस्ते सदर कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमास अहमदनगर जिल्हा व परिसरातुन मोठया प्रमाणात नागरिक खाजगी वाहने घेऊन येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सदर परिसरात वाहतुक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता खर्डा गावातुन जाणाऱ्या वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे
त्यामुळे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी
 १५/१०/२०२१ रोजीचे ०८.०० ते १२.०० वाजेपावेतो खर्डा गावातुन जाणाऱ्या भूम (उस्मानाबाद) या रोडवरील सर्व प्रकारची वाहतुक खालील पर्यायी मार्गाने वळविणेबाबतचा आदेश जारी केला आहे.
खर्डा गावातुन जाणाऱ्या भूम (उस्मानाबाद) या रोडवरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग –
जातेगाव रोड – जातेगावा फाटा तालुका जामखेड – निपाणी – ईट – वडाची वाडी – पाथरुड ता. भूम प्रस्तुत आदेश शासकीस वाहने, अँम्बुलन्स, संरक्षित व्यक्तींचा वाहन ताफा, व कार्यक्रमाच्या अनुषंगाने आवश्यक वाहने यांना लागु राहणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here