जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
दररोजचा पाऊस सोयाबीन पीक पाण्यात गुडघाभर चिखलातून कसेबसे पीक बाहेर काढले जात आहे पण लावलेल्या बुचाडाभोवती तळे साचत आहे गेल्या वीस दिवसांपासून दररोजच पाऊस येत आहे त्यामुळे पीके पाण्यात सडून चालले आहेत. घाटमाथ्यावर दररोजच पाऊस पडत आहे पण पर्जन्यमापक नसल्याने पावसाची नोंद होत नाही नोंद जामखेडची होते. त्यामुळे घाटमाथ्यावरील शेतकरी शासकीय मदती पासून वंचित राहत आहेत.

जामखेड तालुक्यात पाच ठिकाणी पर्जन्यमापक आहेत. जामखेड, नायगाव, खर्डा, नान्नज व अरणगाव अशा पाच ठिकाणी पर्जन्यमापक आहेत यांची सरासरी काढून तालुक्याची सरासरी काढली जाते. अनेक वेळा पर्जन्यमापक असलेल्या ठिकाणी पाऊस नसतो दुसर्या ठिकाणी मुसळधार पाऊस होतो पावसाची नोंद शुन्य असते.

घाटमाथ्यावरील साकत, जातेगाव, दिघोळ हि गावे पुर्णत: भौगोलिक दृष्ट्या मराठवाड्यात आहेत पण प्रशासकीय दृष्टीने ते पश्चिम महाराष्ट्रात येतात. या ठिकाणी दरवर्षी जामखेड पेक्षा दुप्पट पाऊस असतो. पण तरीही कसलीही नुकसान भरपाई मिळत नाही.
साकतला तर जामखेडची चेरापुंजी म्हणतात या ठिकाणी नेहमीच मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो पण या ठिकाणी पर्जन्यमापक नसल्याने पावसाची नोंद होत नाही. सध्या सोयाबीन पीक मोठय़ा प्रमाणावर पाण्यात आहे. दिवसभर पाऊस नाही म्हणून काढून ठेवलेल्या मुठी रात्रीत झालेल्या पावसाने पाण्यात आहेत. तर अनेकांच्या शेतात तळे साचले आहे. पीक पाण्यात आहे. शेतकरी गुडघाभर चिखल तुडवत सोयाबीन काढत आहे मोठ्या प्रमाणावर पीक वाया जात आहे अनेकांचे पीक सडून चालले आहे तर काढुन ठेवलेल्या बुचाडाभोवती पाणीच पाणी तळे साचलेले आहे. मोठय़ा प्रमाणावर पीक वाया जाऊनही अतिवृष्टी आसतानाही पर्जन्यमापक नसल्याने शेतकरी मदती पासून वंचित राहत आहे. तेव्हा साकत परिसरात पर्जन्यमापक बसवावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केलेली आहे.






