मोदी करणार “सिमोल्लघंन” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होणार प्रवेश !!!

0
268
जामखेड न्युज – – – 
 बीड जिल्ह्याच्या राजकारणात काॅग्रेसन पक्ष म्हटला की सर्वात अगोदर राजकिशोर मोदी यांचे नाव घेतले जाते.कोणतीही निवडणुक असो,राजकिशोर मोदी यांच्या शिवाय लढवणे कठीण आहे.अंबाजोगाईतील घराघरामध्ये राजकिशोर मोदी यांची ओळख आहे. गेल्या 30 वर्षापासून काॅग्रेस पक्षाचे एकनिष्ठ नेते असून गेल्या 25 वर्षापासून येथील नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे. सर्व जाती-धर्माला सोबत घेवून राजकारणा बरोबरच सहकार व शैक्षणिक क्षेत्रात मोठी किर्ती निर्माण केली आहे.अंबाजोगाईतील एक मुरब्बी नेता ,अभ्यासू व दूरदृष्टी लाभलेला या नेत्याची सर्व महाराष्ट्रात काॅग्रेसचा सच्चा व कट्टर नेता म्हणून ओळख आहे.त्यामुळेच अंबाजोगाई व परिसरातील हजारो समर्थकांत  राजकिशोर मोदी यांची क्रेझ आहे.राजकीय वर्तुळात स्व.विलासराव देशमुख यांचे मानसपुञ म्हणून राजकिशोर मोदी यांची काॅग्रेस पक्षात ओळख आहे.
*राजकिशोर मोदी यांचे राजकीय वलय*
 अंबाजोगाई शहराच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांत खूप उलथापालथ झाली.2016 च्या न.प.निवडणुकीत राजकिशोर मोदी यांचा व त्यांच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्याकडून मोठा प्रयत्न झाला.नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून झाल्याने तत्कालीन नगराध्यक्ष म्हणून रचनाताई मोदी यांचा विजय झाला.परंतू,काॅग्रेस पक्षाचे सहाच नगरसेवक निवडून आल्याने राजकिशोर मोदी यांना बसलेला त्यांच्या राजकीय कार्यकिर्तीतला सर्वात मोठा धक्का होता.तरीही न डगमगता त्यांनी काॅग्रेसपक्षाचा दरारा कायम ठेवत बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई नगरपालिका काॅग्रेसच्या ताब्यात अबाधीत ठेवली आहे.काॅग्रेस पक्षाने आता राज्यात बीड जिल्ह्याच्या कार्यकरिणीमध्ये मोठा बदल केला आहे. गटातटाचे राजकारण होण्याची संभाव्य भिती व्यक्त केली जात आहे.तसेच वरिष्ठ पातळीवर काॅग्रेसने राजकिशोर (पापा) मोदी यांची सदैव अहवेलना केलीआहे.विधान परिषदेच्या निवडणुकीत नाव माघारी घेण्याचे प्रकार हे सुध्दा राजकिशोर मोदी यांच्या नाराजीचे एक कारण आहे.
*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्यावर शिक्कामोर्तब केले*
गेल्या अनेक दिवसांपासून राजकिशोर मोदी हे काॅग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणाच्या तयारीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत.या बाबत लोकनामा न्यूज पोर्टल चे संपादक बालाजी खैरमोडे यांनी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून बातचीत केली असता त्यांनी आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करण्याचे सांगितले.काॅग्रेस पक्ष सोडण्यामागचे कारण काय आहे ? असा प्रश्न केल्यावर मोदी म्हणाले की,हे आताच सांगणार नाही.जाहीर प्रवेश कार्यक्रमात मी बोलणारच आहे.असे म्हणत,त्यांनी आपण काॅग्रेसला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
*तर राष्ट्रवादी काँग्रेस ची ताकद वाढणार*
राजकिशोर मोदी यांच्या एकंदरीत  बोलण्यावरून हे स्पष्ट झाले आहे की,ते लवकरच मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत.अंबाजोगाईत सध्या माजी आमदार रोमन साठे,नगरसेवक बबन लोमटे यांच्याकडे संपूर्ण पक्षाची धूरा आहे.बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सुध्दा अंबाजोगाई कडे लक्ष केंद्रित केले आहे.तेव्हा राजकिशोर मोदी हे राष्ट्रवादी पक्षात आल्यावर पक्षाची ताकद वाढवून अंबाजोगाई तालुक्यात पक्ष वाढीसाठी मोठी मदत होईल व आगामी न.प.निवडणुकीत राजकिशोर मोदी यांच्या मदतीने न.प.वर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकलेला दिसेल.सध्याच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांशी आजी माजी नगरसेवक मोदींच्या संपर्कात असून त्यांची पण इच्छा आहे की,राजकिशोर मोदी यांनी राष्ट्रवादीत यावे.
*राजकिशोर मोदी यांना मोठे पद दिले जाणार*
राजकीय ताकद पाहता राजकिशोर मोदी यांना जाहीर प्रवेश कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षाकडून मोठे पद दिले जाण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here