पत्रकारांचा ४० वर्षापासून प्रश्न !!! जामखेड येथील पत्रकारांना वसाहत व भवन मार्गी लावण्याची आमदार रोहीत पवार यांनी दिली ग्वाही 

0
301
जामखेड प्रतिनिधी 
                जामखेड न्युज – – – (सुदाम वराट) 
 पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. शहर व तालुक्यातील पत्रकारांसाठी चांगले कार्यालय व निवासाची नितांत आवश्यकता याबाबत पत्रकारांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन नगरपरिषदेकडून जागा उपलब्ध करून पत्रकार भवन व पत्रकार वसाहतीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू अशी ग्वाही आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांना दिली.
       जामखेड पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष नासीर पठाण, उपाध्यक्ष अशोक निमोणकर, सचिव मिठुलाल नवलाखा, सहसचिव अविनाश बोधले, खजिनदार सुदाम वराट, प्रसिद्धीप्रमुख धनराज पवार, जिल्हा प्रतिनिधी मोहिद्दीन तांबोळी, संतोष थोरात, सत्तार शेख, जिल्हा सहचिटणीस यासीन शेख, गुलाब जांभळे, श्रीकृष्ण दुशी, नंदुसिंग परदेशी, समीर शेख, दत्तराज पवार, अनिल धोत्रे, बाळासाहेब शिंदे, गणेश जव्हेरी, बाळासाहेब वराट, अशोक वीर, राजेश भोगिल, किरण रेडे, पोपट गायकवाड, सुनील कोठारी, पप्पू सय्यद, राजेंद्र म्हेत्रे, असिफ सय्यद, वामन डोंगरे, कैलास शर्मा, तुकाराम अंदुरे, संतोष गर्जे, अजय अवसरे, अॅड हर्षल डोके, अॅड अमोल जगताप, रियाज शेख, संतोष नवलाखा, पोपट गायकवाड (पिंपरखेड), फारूख शेख, दादा जगताप, किरण शिंदे, जाकीर शेख यांनी जामखेड मधील पत्रकारांसाठी पत्रकार भवन व पत्रकार वसाहत असावी अशी मागणी निवेदनाद्वारे आमदार रोहित पवारांकडे करण्यात आली तेव्हा आमदार पवारांनी तात्काळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्याशी जागेबाबत चर्चा केली. पत्रकार भवन व वसाहतीच्या जागेचा लवकरात लवकर शोध घेऊन उपलब्ध करून द्यावी असे सांगितले.
       जामखेड तालुक्यात पत्रकार मागील ४० वर्षांपासून पत्रकार भवन वसाहत यासाठी लोकप्रतिनिधी यांच्याकडे निवेदन देऊन आग्रह करीत असे परंतु आश्वासन खेरीज काहीच पदरात पडले नाही. यामुळे प्रलंबित असलेला प्रश्न आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून लवकरात लवकर परंतू आ. रोहीत पवार यांनी स्वताहाहून तालुक्यातील सर्व पत्रकारांना एकत्र या तुम्हाला पत्रकार भवन बांधून देऊ सांगितले होते. त्यानुसार मागील दोन महिन्यापासून तालुक्यातील पत्रकार एकत्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याला यश आले. व पत्रकार संघांची धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात येऊन त्यामध्ये जामखेड, खर्डा, जवळा, नान्नज, हळगाव, पिंपरखेड येथील पत्रकारांना कार्यकारीणीत स्थान देण्यात आले. सर्व पत्रकार आ. रोहीत पवार यांना भेटल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त करून पत्रकारभवन व वसाहत प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
   पत्रकार भवन व वसाहतीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार रोहित पवारांनी दिले तेव्हा आमदार रोहित पवारांचा सर्व पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, अध्यक्ष नासिर पठाण, उपाध्यक्ष अशोक निमोणकर, सचिव मिठुलाल नवलाखा, सहसचिव अविनाश बोधले, खजिनदार सुदाम वराट, प्रसिद्धीप्रमुख धनराज पवार, पप्पू सय्यद, अशोक वीर, जाकीर शेख, दानिश पठाण यांच्या सह अनेकजण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here