पुणे कृषी उपन्न बाजार समितीत उडदाला 9200 रुपये कमाल भाव ; सोयाबीनसाठी मात्र प्रतीक्षाच!!! 

0
365
जामखेड न्युज – – – – 
राज्यतल्या अनेक भागात पडणाऱ्या पावसाचा परिणाम भाजीपाला, अन्नधान्य एकूण बाजारावर झाला आहे. भाजीपाला दरात काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सणासुदीच्या दिवसांमुळे सध्या बाजारात वर्दळ पाहायला मिळते आहे. यंदाच्या खरिपात सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच बाजारातही सोयाबीनचा दर 5000-6000 च्या दरम्यानच असल्याचे पाहायला मिळते आहे. तर दुसरीकडे उडीद पिकाला मात्र चांगला भाव मिळताना दिसत आहे. उडीदला 8400-9200 रुपये इतका भाव मिळाला आहे.
सोयाबीन साठी चांगल्या दराची प्रतीक्षाच
यंदाच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनला चांगला दर मिळेल ही अपेक्षा आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीनची लागवड केली मात्र यावर्षी झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झालेल्या पाहायला मिळते आहे. त्यातच सोयाबीन पिकाचे दरही उतरल्यामुळे शेतकऱ्यांमधून कमालीची नाराजी पसरली सोयाबीनला चांगला दर मिळावा यासाठी अनेक शेतकरी, शेतकरी संघटना आग्रही आहेत. मात्र सोयाबीनचे भाव हे काही वाढताना दिसत नाहीत. बुधवारी दिनांक 6 ऑक्‍टोबर रोजी नाशिक येथील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन ची किमान किंमत 3000 तर कमाल किंमत 6400 इतकी नोंदवली गेली. तर सरासरी किंमत ही 5701 इतकी आहे. तर नाशिक येथील लासलगाव विंचूर येथे सोयाबीन दर हा किमान 3000 कमाल किंमत 6100 तर सरासरी किंमत 5740 इतकी नोंदवली गेली आहे.
दरम्यान सोयाबीनची मार्केट यार्डातील आवक देखील कमी झाली आहे. तसेच अनेक कृषी तज्ञांनी सोयाबीन हा टप्प्याटप्प्याने विकण्यासाठी काढा असे आवाहन शेतकऱ्यांना केल्यामुळे शेतकऱ्यांनी देखील सोयाबीनला भाव मिळण्यासाठी हा त्या पद्धतीने निर्णय घेत असल्याचे दिसून येत आहे. तसेच अद्यापही पावसाची कमी काही होताना दिसत नाहीये त्यामुळे काढणी आणि मळणीच्या कामातही दिरंगाई होताना दिसत आहे.
उडिदाचा भाव 9000 वर
एकीकडे सोयाबीनला चांगला दर मिळण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना असतानाच दुसरीकडे उडीदला मात्र चांगला भाव मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. दिनांक 06 ऑक्टोबर 2021 च्या आकडेवारीनुसार पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत उडीदला सर्वाधिक चांगला दर मिळाल्याचे दिसून येत आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडदाला प्रति क्विंटल किमान भाव 8400 रुपये तर कमाल भाव 9200 रुपये तर सरासरी भाव हा 8850 रुपये इतका मिळाला आहे. त्या खालोखाल सोलापुरातील दुधनी बाजार समितीमध्ये किमान भाव हा 6000 रुपये तर कमाल भाव 7240 तर सरासरी भाव 6800रुपये प्रतिक्विंटल हा उडीदला मिळालेला आहे. त्यामुळे सोयाबीन पेक्षा उडीदला हा चांगला भाव मिळतो आहे. यंदाच्या हंगामात उडीद उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही चांगली बाब म्हणावी लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here