जामखेड न्युज – – –
भारतीय हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुढील 4,5 दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार
प्रादेशिक हवामान विभागानं पावसाचे इशारे जारी केले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाकडून यलो अॅलर्ट
7 ऑक्टोबर : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, अहमदगनर, उस्मानाबाद, नाशिक, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, बुलडाणा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली
8 ऑक्टोबर : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, अहमदगनर, उस्मानाबाद, नाशिक, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड , धुळे, नंदुरबार, जळगाव
9 ऑक्टोबर : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, अहमदगनर, उस्मानाबाद, नाशिक, बीड,औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड
10 ऑक्टोबर : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, अहमदगनर, उस्मानाबाद, नाशिक, बीड,
11 ऑक्टोबर: पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर
तामिळनाडू किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र
तामिळनाडू किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा गोव्यावर प्रभाव कायम आहे. आजपासून पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. तसंच ताशी 40 किमी वेगाने वारेही वाहण्याची शक्यता आहे. तळ कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मोसमी पाऊस या आठवड्यात राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्हांसह कोकणात पावसाची शक्यता आहे.






