जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या वतीने जामखेड येथिल राज लान्स येथे रविवारी १० आॅक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता मा. खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री वस्त्रोद्योग महामंडळ रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत तेव्हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष मंगेश ( दादा) आजबे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पुढीलप्रमाणे आहेत १) आमचे अधिकार – अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सोयाबीन पिकांचे पंचनामे होऊन त्वरीत मदत मिळावी २) ऊसाच्या बिलाची रक्कम तुकडे न पाडता एक रक्कमी एफआरपीच्या नियमानुसार मिळावी ३) सोयाबीन व उडीद पिकासाठी कायमस्वरूपी हमीभाव मिळावा ४) राज्य सरकारने घोषित केलेले ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान त्वरीत मिळाले अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या वतीने जामखेड येथिल राज लान्स येथे रविवारी सकाळी १०.३० वाजता होणार आहे या मेळाव्यासाठी मा. खासदार राजू शेट्टी व रविकांत तुपकर, प्रकाश पोपळे, संदिप जगताप, स्वाभिमानी चे युवक प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, जिल्हाध्यक्ष सुनिल लोंढे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे तालुकाध्यक्ष मंगेश ( दादा) आजबे यांनी दिली आहे.
जागर एफआरपीचा आराधना शक्तीपिठाची
खासदार राजू शेट्टी हे विविध शक्तीपिठाच्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
७ आॅक्टोबर- ज्योतीबा, महालक्ष्मी कोल्हापूर, अदमापुर
८ आॅक्टोबर – दत्त औदुंबर, विठ्ठल रूक्मिणी पंढरपूर, स्वामी समर्थ अक्कलकोट,
९ आॅक्टोबर – तुळजापूर, वाघोली
१० आॅक्टोबर – जामखेड, केज जि. बीड
११ आॅक्टोबर – गेवराई, वडीगोद्री, पैठण
१२ आॅक्टोबर – पैठण, शेवगाव, शनिशिंगणापुर
१३ आॅक्टोबर – अकोले, भिमाशंकर, आंबेगाव, पिंपळगाव, थेऊर
१४ आॅक्टोबर – थेऊर, जेजुरी
१५ आॅक्टोबर – पवारवाडी ता. फलटण
असा शक्तीपिठाचा जागर करत एफआरपीच्या तुकड्याचा लावू नका घाट नाहितर लावू तुमची वाट असा इशारा सरकारला स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.






