जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीची मुसंडी, भाजपला मिळाल्या फक्त ‘इतक्या’ जागा

0
200
जामखेड न्युज – – – 
महाराष्ट्रातील 6 जिल्हा परिषदांमध्ये पोटनिवडणुक झाली. त्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या निकालात राज्यातील सत्ताधारी महाविकासआघाडी पक्षात असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी, आणि कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारली. जिल्हा परिषदेच्या एकूण 85 जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत आतापर्यंत सर्वच्या-सर्व 85 जागांचे निकाल हाती आले आहेत. या निकालात राष्ट्रवादी 17 जागा, कॉंग्रेस 17 जागा तर शिवसेनेला 12 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय भाजपला 23 तर उर्वरित 16 जागा इतर पक्षांच्या खात्यात गेल्या आहेत.
निकालाची जिल्हावार आकडेवारी बघीतली तर पालघर जिल्हायत 15 जागांचे निकाल हाती आले आहे. याठिकाणी भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी 5-5 जागा तर राष्ट्रवादीने 4 जागा जिंकल्या आहे. 1 जागा इतरांच्या खात्यात गेली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील 11 पैकी 11 जागांचे निकाल हाती आले आहेत. यात भाजप 4, शिवसेना आणि काँग्रेसने प्रत्येकी 3-3 तर राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळवला आहे. धुळे जिल्ह्यातील 15 पैकी 15 जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपाने 8, राष्ट्रवादीने 3, काँग्रेसने 2 आणि शिवसेनेने दोन जागेवर विजय मिळवला आहे.
नागपूर जिल्ह्यातील 16 पैकी 16 जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये 9 जागांवर विजय मिळवत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. तर भाजपाने तीन आणि राष्ट्रवादीने दोन जागांवर विजय मिळवला. उर्वरीत 2 जागांवर इतरांनी बाजी मारली. वाशिममधील 14 पैका 14 जागांचे निकाल हाती आले असून यामध्ये राष्ट्रवादीने 5, काँग्रेस आणि भाजपाने प्रत्येकी 2, शिवसेनेने 1 आणि इतरांनी 4 जागांवर कब्जा केला. निकालाचे एकूण समिकरण बघता महाविकासआघाडीने सर्वाधिक 46 जागा जिंकल्या असून भाजपला 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here