अतिवृष्टीने नुकसान झालेल्या कांदा व सोयाबीन पिकांचे पंचनामे करावेत म्हणून भाजपाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

0
199
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
मागील काही दिवसांपासून जामखेड तालुक्यातील घाटमाथ्यावरील तसेच इतरही काही गावांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे सोयाबीन व कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला असून हातात आलेले पीक पाण्यात गेले आहे. या नुकसानीची दखल घेत भारतीय जनता पार्टी जामखेड तालुका वतीने नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे व हेक्टरी 25 हजार रुपये मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी, जेणेकरून सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेतकरी वर्गसह तहसील समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला.
     तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देताना कर्जत – जामखेड विधान सभा प्रमुख रवि सुरवसे, भाजपाचे तालुका अध्यक्षअजय काशिद, पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ. भगवानराव मुरुमकर, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरने, साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट, प्रविन चोरडीया, विधी आघाडी जिल्हा अध्यक्ष प्रविन सानप, पाटोदा सेवा सोसायटीचे चेअरमन आशोक महारनवर, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष उदयसिंह पवार,  गोरख घनवट, मनोज काका कुलकणीं, युवामोर्चा तालुकाध्यक्ष  शरद कार्ले, उपाध्यक्ष  मोहनमामा गडदे, उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगरसेवक आमितशेठ चिंतामनी, रत्नापुरचे सरपंच दादाबापु वारे,  पांडुरंग उबाळे, डाॅ गणेश जगताप, सरचिटनीस आर्जुन म्हेत्रे, उपाध्यक्ष, दत्ता शिंदे, वैभव  कार्ले, आण्णा वायसे ,  उपसरपंच खर्डा मा मदन पाटिल,  हारीदास मुरुमकर, बाजीराव गोपाळघरे, महेश मासाळ,पांडुरंग मोरे,  पप्पु काशिद, पिंटु वस्ताद माने,गणेश मोरे,डाॅ बोराटे, तुषार बोथरा आदी उपस्तीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here