जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – -(सुदाम वराट )
आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतून जगातील सर्वात उंच भगवा ध्वज ऐतिहासिक अशा खर्डा शहरातील किल्ल्यावर विजयादशमीच्या दिवशी फडकणार आहे. त्यासाठी देशभरातून वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तेव्हा आमदारांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी खर्डा शहराची स्वच्छता मोहीम हाती घेतली असून कौतुका नदीचे खोलीकरण व सुशोभीकरण काम युद्धपातळीवर सुरू आहे त्यामुळे शहराचा कायापालट झालेला दिसत आहे.
याबाबत माहिती अशी की बारामती अग्रीकल्चर डेव्हलपमेंटच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांच्या संकल्पनेतून खर्डा येथील कौतुका नदीचे सुशोभीकरण चे काम सुरू करण्यात आले असून त्यामुळे नदीने मोकळा श्वास घेतला आहे, नदीच्या परिसरातील मोठं मोठ्या बाभळी व इतर झाडांनी व्यापला होता मोठ्या नदीचे रूपांतर छोट्या डबक्यात झाले होते,15 ऑक्टोबरला खर्डा किल्ल्यासमोर भारतातील सर्वात उंच स्वराज्य भगवा ध्वज बसविण्यात येणार आहे त्यामुळे शहरात खर्डा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहभागातुन स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. स्वराज्य ध्वजा मुळे सर्वत्र उत्साह जाणवत आहे प्रत्येक वॉर्डातील महिला व पुरुष सकाळी आपआपला परिसर स्वच्छ करण्यास मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यामुळे स्वच्छता अभियान लोकचळवळ बनली आहे.
त्यातच खर्डा गावाच्या प्रथम दर्शनी असणारी कौतुका नदीची फार दुर्दशा झाली होती परिसरात मोठ्या झाडांनी दुर्गंधी पसरली होती नदी ही अरुंद होत चालली होती या नदीचे घाणीचे साम्राज्य सौ.सुनंदा पवार यांच्या लक्षात आले त्यांनी तातडीने पोकलेनची व्यवस्था केली व स्वच्छता करण्यासाठी सुविधा निर्माण केली त्या माध्यमातून नदिच्या पूर्ण परिसरातील झाडे काढण्यात आली व नदीचे खोलीकरण ही करण्यात आल्याने कौतुका नदीचे पात्र ही मोठे दिसू लागले आहे, खर्डा गावाच्या प्रवेशद्वारातच मोठी स्वच्छता दिसून येत आहे, यामुळे कौतुका नदीचे झालेले काम कौतुक करण्यासारखे झाले असल्याची चर्चा खर्डा ग्रामस्थांमधून बोलताना व्यक्त केली जात आहे, यासर्व कामामुळे खर्ड्याच्या कौतुका नदीने मात्र मोकळा श्वास घेतला आहे. व स्वच्छ खर्डा सुंदर खर्डा असे रूपांतर झालेले दिसत आहे.