पोलीस शिपाई पदाच्या 720 जागांसाठी भरती, लेखी परीक्षा 23 ऑक्टोबरला!!!

0
180
जामखेड न्युज – – – 
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपाई पदाच्या 720 जागा भरल्या जाणार आहेत. दोन वेळा लेखी परीक्षेचा मुहूर्त चुकला असून आता तिसरा मुहूर्त ठरला आहे. त्यानुसार 23 ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर दुपारी तीन ते चार या वेळेत पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा होणार आहे.
15 ऑगस्ट 2018 रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय नव्याने सुरू झाले. त्यावेळी आयुक्तालयासाठी तीन टप्प्यात पूर्ण मनुष्यबळ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सन 2019 मध्ये पहिल्या टप्प्यातील पोलीस भरतीला सुरुवात झाली. मध्यंतरी कोरोना साथ आल्याने ही भरती प्रक्रिया रखडली. आता सर्व बाबी पूर्वपदावर येत असल्याने पोलीस भरतीची प्रक्रिया देखील राबवली जात आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पहिल्या टप्प्यात उपलब्ध असलेल्या 720 जागांसाठी तब्बल एक लाख 89 हजार 732 अर्ज आले आहेत.
कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा?
सर्वसाधारण – 176
महिला – 216
खेळाडू – 38
प्रकल्पग्रस्त – 38
भूकंपग्रस्त – 14
माजी सैनिक – 107
अंशकालीन पदवीधर – 71
पोलीस पाल्य – 22
गृहरक्षक दल – 38

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here