जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
जामखेड पोलीस स्टेशनला एका आठवड्यात सावकारांच्या विरोधात तीन गुन्हे दाखल झाले असून यामध्ये दोन जामखेड शहरातील व एक तालुक्यातील बांधखडक येथे घडली आहे. यावरून जामखेड तालुक्यात खाजगी सावकारकीची पाळेमुळे किती खोलवर रूजली आहेत हे दिसून येते. ही पाळेमुळे खणून काढणे जरी अवघड असले तरी जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सावकारांविरूध्द हाती घेतलेल्या मोहीमेमुळे सावकार पिडीत लोक आता पुढे येऊ लागले आहेत. व तक्रारी करू लागले आहेत तक्रारींची शहानिशा करून जामखेड पोलीसही अवैध सावकारकी विरोधात गुन्हे दाखल करत आहेत.
जामखेड तालुक्यातील बांधखडक येथील झाडू तयार करणाऱ्या सुनील लक्ष्मण अडागळे (वय 34) यांना खाजगी सावकार व या गुन्ह्य़ातील आरोपी सोमीनाथ बाजीराव वनवे 2) सोपान बाजीराव वनवे यांनी २०,००० रुपये ५ % ( टक्के) व्याजाने दिले होते. त्या पैश्याच्या व्याजापोटी ५०,००० रुपये देऊनही सावकाराचे पुन्हा सुनील अडागळे यांच्याकडे १५००० रुपये राहिले आहेत असे म्हणून पैशाचा तगादा लावला. व घरासमोर बांधलेल्या २ शेळ्या आरोपी सोमीनाथ बाजीराव वनवे याने बळजबरीने घेऊन गेला. आहे सदरच्या शेळ्या फिर्यादीची पत्नी सावकाराकडे आणण्यासाठी गेली असता. यातील दुसरा आरोपी सोपान बाजीराव वनवे म्हणाला की, माझे पैसे आत्ताच्या आत्ता दे व तुझ्या शेळ्या घेऊन जा. असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करून चापटीने मारहाण केली. तेव्हा सुनील लक्ष्मण अडागळे तेथे जाऊन आपल्या पत्नीला घरी घेऊन गेला आहे. आरोपी क्र.१ हा फिर्यादीचे घरासमोर येऊन म्हणाला की, मी गावात लोकांना साखर वाटली आहे माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही. असे म्हणून फिर्यादी व त्यांचे कुटुंबियांना शिवीगाळ केले यावरून सुनील लक्ष्मण अडागळे यांचे फिर्यादीवरून आरोपी सोमीनाथ बाजीराव वनवे. सोपान बाजीराव वनवे यांचे विरोधात भा.द.वि. कलम 327, 323, 504, 506, 34 महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायदा कलम 39 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि २७/९/२०२१ रोजी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास ते दिनांक २९/९/२०२१ रोजी ८ वाजताचे सुमारास फिर्यादीचे घरासमोर बांधखडक ता. जामखेड येथे घडली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. व्ही. शेंडे हे करत आहेत.
आणखीही लोकांनी पुढे यावे अवैध सावकारकी विरोधात तक्रारी दाखल कराव्यात असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे.