राष्ट्रवादी चित्रपट,कला,साहित्य व सांस्कृतिक विभाग सेल च्या जामखेड तालुका अध्यक्षपदी दिपक तुपेरे सर यांची निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या हस्ते देण्यात आले.
अहमदनगर येथील राष्ट्रवादी भवन येथे नुकतीच जिल्ह्यातील राष्ट्रवादी सांस्कृतिक विभाग सेल ची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी जिल्ह्यातील सांस्कृतिक सेल च्या जिल्हा कार्यकारणी पदांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. या मध्ये जामखेड तालुक्यातुन सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आसलेले व कला शिक्षक दिपक तुपेरे सर यांची जामखेड तालुका राष्ट्रवादी सांस्कृतिक सेल च्या तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मा.प्रा.सितारामजी काकडे सर ,उपाध्यक्ष किसणरावजी लोटके,अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष डॉ. श्याम शिंदे सर,कार्याध्यक्ष भगवान राऊत, सरचिटणीस रियाज पठाण, चिटणीस अजयकुमार पवार, शिवानंद भांगरे,हसनशेख पाटेवाडीकर,जयश्री जगताप, कल्याण काळे,दिलीप शिंदे, डॉ. संदिप सांगळे,डॉ. रत्ना वाघमारे, राधाकृष्ण कराळे हे मान्यवर उपस्थित होते.
दिपक तुपेरे सर हे गेल्या पंचवीस वर्षापासून जामखेड तालुक्यातील सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहेत. तसेच त्यांना कला, साहीत्य, नाट्य, अशा क्षेत्राची आवड असुन अनेक विविध नाटक, एकांकिका,राज्य नाट्य स्पर्धा, शॉर्ट फिल्म, व गाव लई जोरात आणि डोमकावळे या वेबसीरीज दिग्दर्शित केल्या आहेत . तसेच लवकरच तालुक्यातील पुढील कार्यकारणी जाहीर करण्यात येणार आसल्याची माहिती त्यांनी दिली.