जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
शेतकऱ्यांची पोटखराबा या शिर्षका असलेल्या शेतजमीची अडचण व त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे अतोनात नुकसान लक्षात घेता शासनाने शेतजमीनीतील पोटखराबा हे क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी एक योजनेचा सुरू केली असून जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी जामखेड न्युजशी बोलताना केले.
तहसीलदार योगेश चंद्रे यांनी जामखेड येथील तहसीलदार पदाचा पदभार घेताच. तहसील कार्यालयातील मरगळीस आलेली यंत्रणा कार्यान्वित करण्यास सुरुवात केली आहे. नेहमी प्रमाणे बदलून आलेल्या तहसीलदार यांचा सत्कार करणाऱ्या पक्ष संघटनाचा सत्कार स्विकारण्यातच वेळ न दवडता सत्कार स्विकारतच त्यांनी त्यांच्या काम करण्याच्या पध्दतीची कार्यतत्परता दाखवून दिली आहे. आपला पदभार स्विकारताच जामखेड तहसील कार्यालया अंतर्गत येणाऱ्या कोतवालापासून नायब तहसीलदार यांच्या पर्यंत सर्वांनाच विश्वासात घेऊन जामखेड तालुक्यातील महसूल यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी विविध सुचना व मार्गदर्शन करत कामाला सुरुवात केली आहे.
राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हाती घेतलेल्या सप्तपदी अभियान राबविण्यात दिलेल्या नियमावली अंतर्गत जामखेड तालुक्यातील सर्व शेतकरी खातेदारांना आपल्या ७/१२ वरील पोटखराब वर्ग अ लागवडीखाली आणण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. यानुसार त्यांनी तहसील कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सर्वच तलाठी, मंडलाधिकारी व संबंधित अधिकारी यांना आदेश देतानाच शेतकऱ्यांनाही विविध माध्यमातून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सोशल मीडियावरून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करताना म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील सर्व शेतकरी खातेदारांना आपल्या ७/१२ वरील पोटखराब वर्ग अ लागवडीखाली आणण्याची सुवर्णसंधी.आपल्या ७/१२ वरील वर्ग अ चा पोटखराबा आता आपल्याला लागवडी खालील क्षेत्रात आणता येणार आहे.आपल्या ७/१२ वर पोटखराब क्षेत्र आपण लागवडीखाली आणले आहे परंतु अजूनही ७/१२ वर ते पोटखराबा दिसत आहे तर आपल्यासाठी शासनाच्या वतीने ही मोहीम चालू झालेली आहे. त्याचा सर्व खातेदार यांनी लाभ घ्यावा. त्यासाठी आपल्या गावातील तलाठी यांच्याशी तात्काळ संपर्क साधून आपला फॉर्म भरून द्या .आपला ७/१२ वरील पोटखराबा लागडीलायक क्षेत्रात आणण्याची सुवर्णसंधी आपण गमावू नये.सर्व खातेदारांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.