श्री नागेश विद्यालयात डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

0
309
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची 134 वी जयंती सोहळा रयत शिक्षण संस्थेच्या नागेश संकुलात उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर प्रमुख उपस्थिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, माजी सहसचिव भोसले एम के , रा काँ महाराष्ट्र प्रदेश  सरचिटणीस राजेंद्रजी कोठारी कन्या विद्यालय स्कूल कमिटी अध्यक्ष प्रा मधुकर( आबा) राळेभात, सुरेश भोसले ,प्रकाश सदाफुले ,प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापिका सौ चौधरी के डी, जिल्हा  बँकेचे संचालक अमोल राळेभात, नगरसेवक दिगंबर चव्हाण,
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे,
 सरपंच हवा सरनोबत, उपप्राचार्य प्रकाश तांबे, पर्यवेक्षक साळवे डी एन, सोनवणे पी डी, प्रा. विनोद सासवडकर , प्रा वायकर, गुरुकुल प्रमुख संतोष ससाणे, एनसीसी प्रमुख मयुर भोसले, कुंडल राळेभात,महेश राऊत,मुक्तार सय्यद, यादव साहेब , नागेश व कन्या विद्यालयातील सर्व रयत सेवक व ग्रामस्थ  उपस्थित होते.
     सुरुवातीला प्रतिमा पूजन करण्यात आले व प्रास्ताविक प्राचार्य मडके बी के यांनी केले.
     माजी सहसचिव भोसले एम के  यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या उल्लेखनीय घटनांचा व कार्य बद्दलची माहिती दिली.
 मुख्याधिकारी यांनी दंडवते यांनी कर्मवीरांचे कार्य सर्वसमावेशक आहेत व सर्वांनी त्यांच्या विचाराचे प्रेरित होऊन काम करावे असे मनोगत व्यक्त केले.
 कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभाऊ बेलेकर यांनी कर्मवीरांच्या विचारामुळे समाजातील दीनदुबळे दलित घटकाना शिकण्याची संधी मिळून उत्कर्ष झाला आहे व  असे मनोगत व्यक्त केले.
       सूत्रसंचालन प्रा रमेश बोलभट आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका सौ चौधरी के डी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here