जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट )
निवारा बालगृहाला करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी बालगृहातील मुला-मुलींच्या जेवणासाठी 15 दिवस पुरेल एवढे अन्नधान्य व किराणा दिला. मुलांची शैक्षणिक प्रगती पाहता ते म्हणाले हा प्रकल्प म्हणजे गुन्हेगार मुक्तीचा नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रकल्प आहे.
आज ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह मोहा फाटा (समता भुमी) ता- जामखेड जि- अहमदनगर या ठिकाणी गेली 2015 पासून अनाथ, निराधार, वंचित, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार, लोककलावंत, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त घटकातील 71 मुला-मुलींच्या शिक्षणासाठी हे बालगृह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक व विविध क्षेत्रातील लोकांच्या मदतीतून व लोकवर्गणीतून हे बालगृह चालवले जाते,
बालगृहाला भेट देण्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे बालगृहातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन स्वागत केले व त्यांचा गुलाब पुष्प व शाल देऊन सत्कार करण्यात आला,
यावेळी मा.कोकणे बोलताना म्हणाले की खूप दिवसापासून बालगृहाला भेट देण्यासाठी येण्याची इच्छा होती परंतु कामाच्या व्यापाने वेळ मिळत नव्हता परंतु आज नियोजित वेळ काढून भेट देण्यासाठी आलो येथे आल्यानंतर मी भारावून गेलो की येथील परिसर स्वच्छता व निसर्गाच्या सानिध्यात असणारे हे बालगृह भेट देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आकर्षण करणार आहे येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता पाहिल्या नंतर असे लक्षात आले की डोनेशन भरून शिक्षण घेणाऱ्या मुलांपेक्षाही या मुलांचा अभ्यास जास्त आहे, हा प्रकल्प गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी उभा राहिलेला प्रकल्प आहे येथे येऊन खरंच आनंद वाटला की येथील अनाथ निराधार मुलांच्या चेहऱ्यावरील हसू हे एक कुठे तरी त्यांचे उज्वल भविष्य घडेल असे सांगत होते, ते पुढील काळात खूप मोठे अधिकारी बनतील त्यासाठी या बालगृहातील मुलांना जी काही साधन सामग्री लागेल ती मला सतत कळवत जावे असे मत त्यांनी व्यक्त केले,
तसेच संस्थेचे संस्थापक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी संस्थेची संपूर्ण माहिती दिली व प्रकल्प समन्वयक संतोष चव्हाण सर यांनी सुत्रसंचालन केले,
यावेळी कुसडगावचे सरपंच मा. हवा सरनोबत, राजू भैय्या सय्यद, पंकज कोकणे, सोनू कदम, निवारा बालगृहाचे अधिक्षक वैजीनाथ केसकर, दिगांबर पवार, तरडगावच्या सरपंच सौ. संगीता केसकर,व विद्यार्थी उपस्थित होते,










