Saturday, August 15, 2026
Home ताज्या बातम्या १७ सप्टेंबर रोजी बंचित बहुजन आघाडीची बैठक, पक्ष प्रवेशाबरोबरच इतर विषयांवर चर्चा...

१७ सप्टेंबर रोजी बंचित बहुजन आघाडीची बैठक, पक्ष प्रवेशाबरोबरच इतर विषयांवर चर्चा – अॅड. अरुण जाधव

0
225
१७ सप्टेंबर रोजी बंचित बहुजन आघाडीची बैठक, पक्ष प्रवेशाबरोबरच इतर विषयांवर चर्चा – अॅड. अरुण जाधव
जामखेड प्रतिनिधी 
          जामखेड न्युज – – ( सुदाम वराट) 
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जामखेड तालुका कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत जामखेड शहर कार्यकारिणी निवड व विविध पक्ष संघटनांमधून वंचित बहुजन आघाडीत येणाऱ्या कार्यकर्त्याना प्रवेश देण्याबरोबरच इतरही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.
      दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ :०० वाजता जामखेड येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या या बैठकीसाठी पक्षीनिरीक्षक रामभाऊ मरगळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, व भटके विमुक्तांचे नेते ॲड. अरुण जाधव हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, दक्षिण जिल्हा सचिव योगेश साठे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश सदाफुले, भिमराव चव्हाण, जिल्हा संघटक फिरोज पठाण, तालुकाध्यक्ष अतिष पारवे व अजिनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. तरी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!