Saturday, November 14, 2026
Home ताज्या बातम्या बेलवंडीचे पोलीस अधिकारी नंदकुमार सोनवलकर यांची राज्यस्तरावर ‘गोल्डन कामगिरी’! पोलीस महासंचालक...

बेलवंडीचे पोलीस अधिकारी नंदकुमार सोनवलकर यांची राज्यस्तरावर ‘गोल्डन कामगिरी’! पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ पुरस्काराने सन्मानित, अहिल्यानगर पोलीस दलाचा गौरव!

0
2
बेलवंडीचे पोलीस अधिकारी नंदकुमार सोनवलकर यांची राज्यस्तरावर ‘गोल्डन कामगिरी’!  पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ पुरस्काराने सन्मानित, अहिल्यानगर पोलीस दलाचा गौरव!

जामखेड न्युज – – – – – 

बेलवंडीचे पोलीस अधिकारी नंदकुमार सोनवलकर यांची राज्यस्तरावर ‘गोल्डन कामगिरी’!

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ पुरस्काराने सन्मानित, अहिल्यानगर पोलीस दलाचा गौरव!

गुन्ह्यांचा तपास, प्रभावी पुरावे आणि न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्याच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार हनुमंत सोनवलकर यांना महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने प्रतिष्ठेच्या ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मा. सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ०५/२०१८ मधील गंभीर गुन्ह्याच्या अपराधसिद्धीसाठी सोनवलकर यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय ठरले. भारतीय दंड विधानातील कलम ३६३, ३७६ (१) (आय), ३०२, २०१ तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४, ६, ८ व १० अन्वये दाखल या गुन्ह्यात प्रभावी कामगिरी केल्याबद्दल सप्टेंबर २०२६ महिन्याच्या सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.

१३ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रशस्तीपत्र क्रमांक ८० अन्वये हा सन्मान प्रदान करण्यात आला. प्रशस्तीपत्रात सोनवलकर यांनी अपराधसिद्धीसाठी दिलेले योगदान निश्चितच उल्लेखनीय असल्याचे नमूद करण्यात आले असून, भविष्यातही त्यांनी अशीच उत्कृष्ट कर्तव्यनिष्ठा दाखवून महाराष्ट्र पोलीस दलाच्या गौरवशाली परंपरेत भर घालावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


या पुरस्कारामुळे बेलवंडी पोलीस स्टेशनसह अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तपासातील कौशल्य, कर्तव्याप्रती निष्ठा आणि गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत शिक्षा मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना राज्यस्तरावर मिळालेली ही पोचपावती मानली जात आहे.

सोनवलकर यांच्या या यशाबद्दल अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षिरसागर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यस्तरावरील या सन्मानामुळे बेलवंडी आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस दलाचा गौरव वाढला असून, सोनवलकर यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!