Home क्राईम न्यूज राहुल अंधारेचा हात तोडणारे दोन सराईत समोर, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार

राहुल अंधारेचा हात तोडणारे दोन सराईत समोर, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार

0
6
राहुल अंधारेचा हात तोडणारे दोन सराईत समोर, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार

जामखेड न्युज – – – – – 

राहुल अंधारेचा हात तोडणारे दोन सराईत समोर, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार

 

जामखेड शहरातील कलाकेंद्र चालक राहुल हिरामन अंधारे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात बीड जिल्ह्यातील आष्टी येथील दोघांसह एका अनोळखी साथीदाराविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्वी दाखल केलेल्या एका गुन्ह्याचा राग मनात धरून हा हल्ला केल्याची माहिती फिर्यादीतून समोर आली आहे. या घटनेमुळे जामखेड शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

चहा पित असताना अचानक हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास राहुल अंधारे हे जामखेड-नगर रस्त्यावरील ‘पुढारी वड’ चहा हॉटेलमध्ये मित्रांसोबत चहा पीत बसले होते. त्याचवेळी हरी बेद्रे आणि अमोल ऊर्फ आबा पिसाळ (दोघे रा. आष्टी, जि. बीड) तेथे आले. व मागील वादाचा राग मनात धरून राहुल अंधारे यांच्यावर धारदार शस्त्राने लोखंडी कत्ती कोयत्याने हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

हल्ल्यात राहुल अंधारे गंभीर जखमी
या हल्ल्यात राहुल अंधारे यांच्या डावा
हात मनगटापासून तुटून पडला यात अंधारे यांना गंभीर दुखापत झाली. तसेच छातीवर आणि उजव्या हातावरही वार झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या त्यांच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू असल्याचे वृत्त आहे.
पूर्वीच्या गुन्ह्याचा राग असल्याचा आरोप
राहुल अंधारे यांनी यापूर्वी दाखल केलेल्या एका गुन्ह्याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला आणि त्यानंतर हल्ला केला, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
हल्ल्यानंतर संबंधित आरोपी एका अनोळखी साथीदारासह मोटारसायकलवरून निघून गेल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांचा तपास सुरू
या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), ३५२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टी येथील दोघांसह एका अनोळखी व्यक्तीचा या प्रकरणात उल्लेख आहे. आरोपींचा शोध घेणे आणि हल्ल्यामागील नेमकी पार्श्वभूमी स्पष्ट करणे, या दृष्टीने पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

जामखेड शहरात घडलेल्या या गंभीर घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन संबंधित वस्तुस्थिती स्पष्ट होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!