Home क्राईम न्यूज गुटखा पकडला, मग ‘गायब’ केला कुणी? जामखेड पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह! अखेर...

गुटखा पकडला, मग ‘गायब’ केला कुणी? जामखेड पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह! अखेर DYSP ची एन्ट्री, चौकशी सुरू!

0
5
गुटखा पकडला, मग ‘गायब’ केला कुणी? जामखेड पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!  अखेर DYSP ची एन्ट्री, चौकशी सुरू!

जामखेड न्युज – – – – – – 

गुटखा पकडला, मग ‘गायब’ केला कुणी? जामखेड पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

अखेर DYSP ची एन्ट्री, चौकशी सुरू!

जामखेड तालुक्यात अवैध गुटखा तस्करी आणि विक्रीचा मुद्दा ऐरणीवर आला असताना, गुटखा पकडल्याची चर्चा झाली, मात्र त्यानंतर संबंधित यंत्रणांनी नेमकी कोणती कारवाई केली? याबाबत स्पष्ट माहिती समोर आली नव्हती. नक्की कारवाई कोणी केली, गुटखा कोठून आणला होता, तो कोणाचा होता आणि पकडल्यानंतर त्याचे पुढे काय झाले? या प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्त्यात आहेत.

या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. ०९ रोजी अहिल्यानगर येथून काही वर्तमानपत्रात वृत्त प्रसिद्ध झाले होते यात संबंधित यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या वृत्ताची दखल घेत पोलीस उपाधीक्षक सुजीत क्षीरसागर यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याने या प्रकरणाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या प्रकरणी योग्य चौकशीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते डॉ अॅड अरूण जाधव हे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देणार आहेत. 

जामखेडमध्ये गुटखा सापडल्याची माहिती समोर आल्यानंतरही या प्रकरणात पारदर्शकपणे कारवाई झाल्याचे चित्र स्पष्ट झाले नव्हते. गुटखा पकडण्यात आला असेल, तर त्याचा पंचनामा झाला का? मुद्देमाल जप्त करण्यात आला का? संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला का? की प्रत्यक्ष कारवाई होण्यापूर्वीच प्रकरण मिटवण्यात आले? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘तो’ गुटखा सोडला कुणी? चौकशीकडे लक्ष!
या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गुटखा पकडल्यानंतर नेमकी कोणती कार्यवाही झाली? संबंधित गुटखा कोणाच्या ताब्यात होता? कारवाईची जबाबदारी कोणत्या यंत्रणेवर होती? आणि कारवाई झाली नसेल, तर त्याची कारणे काय होती? या प्रश्नांची उत्तरे चौकशीनंतरच मिळणे अपेक्षित आहे.

जामखेड पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या संबंधित भूमिकेबाबत यापूर्वी प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, नेमकी कोणती यंत्रणा कारवाईसाठी जबाबदार होती, याबाबत अधिकृत निष्कर्ष समोर येणे आवश्यक आहे.

चौकशीचा निष्कर्ष काय? नागरिकांची नजर!
वर्तमानपत्रातील वृत्तानंतर सुरू झालेल्या चौकशीमुळे या प्रकरणातील सत्य समोर येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. गुटखा पकडल्यापासून ते त्यानंतरच्या कथित घडामोडींपर्यंत प्रत्येक टप्प्याची तपासणी झाल्यास जबाबदारी निश्चित करण्यास मदत होऊ शकते.

आता प्रश्न एकच – जामखेडमध्ये गुटखा पकडल्यानंतर नेमके काय घडले? चौकशीत संबंधितांची भूमिका स्पष्ट होणार का, कारवाईच्या नोंदी तपासल्या जाणार का आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होणार का? या प्रश्नांची उत्तरे पोलीस उपाधीक्षकांच्या चौकशीच्या निष्कर्षातूनच स्पष्ट होतील. त्यामुळे या प्रकरणाकडे जामखेड तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!