Sunday, October 4, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडच्या भूमिपुत्राचा पुण्यात डंका! ॲड. डॉ. अरुण जाधव यांना समाजसेवा पुरस्कार ...

जामखेडच्या भूमिपुत्राचा पुण्यात डंका! ॲड. डॉ. अरुण जाधव यांना समाजसेवा पुरस्कार भटक्या-विमुक्त समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक उन्नतीतील योगदानाची BS4 महाराष्ट्राकडून दखल

0
2
जामखेडच्या भूमिपुत्राचा पुण्यात डंका! ॲड. डॉ. अरुण जाधव यांना समाजसेवा पुरस्कार  भटक्या-विमुक्त समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक उन्नतीतील योगदानाची BS4 महाराष्ट्राकडून दखल

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेडच्या भूमिपुत्राचा पुण्यात डंका! ॲड. डॉ. अरुण जाधव यांना समाजसेवा पुरस्कार

भटक्या-विमुक्त समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक उन्नतीतील योगदानाची BS4 महाराष्ट्राकडून दखल

भटक्या-विमुक्त समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्य करणारे जामखेडचे भूमिपुत्र, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना BS4 महाराष्ट्राच्या वतीने समाजसेवा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

पुणे येथे रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण आणि भटक्या-विमुक्त समाज संकल्प सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये ॲड. डॉ. अरुण जाधव यांना समाजसेवा क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आला.

BS4 महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. शिवाजी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या हस्ते झाले. कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त प्रमोदकुमार पवार तसेच नाशिक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

भटक्या-विमुक्त समाजाच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणे, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न करणे तसेच वंचित घटकांना न्याय व विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण २६ मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये जामखेडचे ॲड. डॉ. अरुण जाधव यांना समाजसेवा क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने जामखेडच्या सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातही त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

या वेळी अशोक पवार, आश्रुबा शिंदे, लक्ष्मी शिंदे, राज नायकिले, भगवान गावित, किशोर वायफळकर, सुनील सुर्वे यांच्यासह BS4 महाराष्ट्राचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲड. डॉ. अरुण जाधव यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे जामखेडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!