Home ताज्या बातम्या शेतकऱ्यांच्या नुकसान पंचनाम्यात हलगर्जीपणा, पिंपरखेड-हसनाबादचे ग्राम महसूल अधिकारी सलिम मुलाणी निलंबित! ...

शेतकऱ्यांच्या नुकसान पंचनाम्यात हलगर्जीपणा, पिंपरखेड-हसनाबादचे ग्राम महसूल अधिकारी सलिम मुलाणी निलंबित! अतिवृष्टी, पूर व गारपिटीने नुकसान होऊनही पंचनामे न केल्याचा ठपका, वारंवार गैरहजेरी आणि कामकाजात सुधारणा न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

0
5
शेतकऱ्यांच्या नुकसान पंचनाम्यात हलगर्जीपणा, पिंपरखेड-हसनाबादचे ग्राम महसूल अधिकारी सलिम मुलाणी निलंबित!  अतिवृष्टी, पूर व गारपिटीने नुकसान होऊनही पंचनामे न केल्याचा ठपका, वारंवार गैरहजेरी आणि कामकाजात सुधारणा न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

जामखेड न्युज – – – – – – 

शेतकऱ्यांच्या नुकसान पंचनाम्यात हलगर्जीपणा, पिंपरखेड-हसनाबादचे ग्राम महसूल अधिकारी सलिम मुलाणी निलंबित!

अतिवृष्टी, पूर व गारपिटीने नुकसान होऊनही पंचनामे न केल्याचा ठपका, वारंवार गैरहजेरी आणि कामकाजात सुधारणा न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

जामखेड तालुक्यातील पिंपरखेड हसनाबाद परिसरात अतिवृष्टी, पूर व गारपिटीमुळे झालेल्या शेतजमिनींच्या नुकसानीचे संपूर्ण पंचनामे न केल्यामुळे काही शेतकरी नुकसानभरपाईच्या अनुदानापासून वंचित राहिल्याच्या तक्रारी तसेच शासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून पिंपरखेड-हसनाबादचे ग्राम महसूल अधिकारी सलिम बाबुलाल मुलाणी यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी अहिल्यानगर पंकज आशिया यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदींनुसार हा आदेश काढला आहे. या आदेशावर २८ सप्टेंबर २०२६ रोजी डिजिटल स्वाक्षरी करण्यात आली आहे.

आदेशात नमूद केल्यानुसार, जामखेड तालुक्यातील पिंपरखेड व हसनाबाद येथे नोव्हेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी, पूर आणि गारपीट झाल्याने शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र या नुकसानीचे संपूर्ण स्थळपाहणी पंचनामे न झाल्यामुळे काही नुकसानग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्याचे निदर्शनास आले. त्यातून संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या.

याशिवाय, संबंधित अधिकारी सज्जावर अनुपस्थित राहत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. ८ डिसेंबर २०२५ रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावूनही कामकाजात सुधारणा झाली नाही, तसेच वारंवार कार्यालयीन वेळेत गैरहजेरी राहिल्याचा ठपका आदेशात ठेवण्यात आला आहे.
ग्राम महसूल अधिकारी सलिम बाबुलाल मुलाणी यांनी पदाच्या कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचे दिसून आल्याने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक प्रस्ताव सादर करण्यात आला होता. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ नुसार प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने शासकीय कामात निष्ठा, सचोटी आणि कर्तव्यपरायणता राखणे अपेक्षित असते. तसेच शासकीय कर्मचाऱ्याने अशोभनीय ठरेल असे कोणतेही कृत्य करू नये, अशी तरतूद आहे. संबंधित अधिकाऱ्याने या नियमांचे पालन केले नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

त्यानुसार महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४(१)(अ) अन्वये जिल्हाधिकारी तथा नियुक्ती प्राधिकारी यांनी सलिम बाबुलाल मुलाणी यांना शासन सेवेतून निलंबित केले आहे.

निलंबन काळात पारनेर मुख्यालय
निलंबनाच्या कालावधीत सलिम मुलाणी यांचे मुख्यालय तहसील कार्यालय, पारनेर येथे निश्चित करण्यात आले असून, तहसीलदार पारनेर यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबन कालावधीत त्यांनी खासगी नोकरी किंवा व्यवसाय करू नये, अशीही स्पष्ट सूचना आदेशात देण्यात आली आहे.

निलंबन काळात त्यांना नियमानुसार निलंबन निर्वाह भत्ता व पूरक भत्ते देय राहतील. तसेच निलंबनाच्या काळात खासगी नोकरी अथवा व्यवसाय करत नसल्याचे प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्यांनी सादर करणे आवश्यक राहणार आहे.

शेतकऱ्यांच्या नुकसान पंचनाम्याच्या कामात झालेल्या हलगर्जीपणासह वारंवार गैरहजेरी आणि कामकाजात अपेक्षित सुधारणा न झाल्याने झालेली ही कारवाई जामखेड तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!