आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नाला यश – खर्डा पोलीस स्टेशन मंजुरी, अनेक वर्षांची मागणी फळास

0
487
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – ( सुदाम वराट) 
आपल्या मतदारसंघातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या आणखी एका प्रयत्नास यश आले असून जामखेड तालुक्यातील खर्डा आणि कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस स्टेशनला  नुकतीच शासनाची मान्यता मिळाली आहे. या पुर्वीही पोलीस प्रशासनाला ताकद देण्यासाठी जामखेड शहरात cctv कॅमेरे, दोन्ही तालुक्यांसाठी अत्याधुनिक दोन जीप व चार मोटार सायकल, विविध ठिकाणी पोलीस चौक्या उभारणे अशा अनेक गोष्टी करण्यात आल्या असून मोठय़ा प्रमाणात गुन्हेगारी आटोक्यात आल्याचे दिसत आहे.
 मागील अनेक वर्षांपासून जामखेड तालुक्यातील खर्डा व कर्जत तालुक्यातील मिरजगाव या ठिकाणी स्वतंत्र पोलिस स्टेशन व्हावे अशी मागणी करण्यात येत आहे. याच मागणीचा पाठपुरावा करून आ. रोहित पवार यांनी नुकतीच दोन्ही पोलिस स्टेशनला परवानगी मिळवली असून, आता खर्डा आणि कर्जत तालुक्यातील मिरजगाव या ठिकाणी स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण होणार आहेत. या दोन्ही पोलिस ठाण्यांमध्ये ७० कर्मचारी देण्याचा निर्णय ही गृह मंत्रालयाने दिला असून लवकरच आता खर्डा पोलीस स्टेशन आणि मिरजगाव पोलीस स्टेशन कार्यान्वित होतील.
यामुळे जामखेड आणि कर्जत तालुके लोकसंख्या मोठी असल्याने अनेक वेळा पोलिस संख्या अभावी तपास कामांमध्ये अनेक अडचणी येत होत्या मात्र आता दोन्ही तालुक्यांचे पोलिस स्टेशनचे विभाजन झाल्याने पोलीस बळ वाढणार असून मतदार संघातील गुन्हेगारी कमी करण्यास मदत होणार आहे.
या निर्णयाबद्दल आघाडी सरकार व आ. रोहित पवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा आणि  या ठिकाणी नवीन स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण करण्यासाठी ग्रह मंत्रालयाने परवानगी दिली असून, आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नाला मोठे यश आले असून आता  या भागातील गुन्ह्याचे प्रमाण कमी होण्यास मोठा हातभार लागणार असल्याने जनतेतून आनंद व्यक्त केला जात आहे,आता लवकरच खर्डा या ठिकाणी स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण होणार आहे, त्यामुळे खर्डा येथील पोलिस ठाण्यांमध्ये 35 नविन पोलीस  कर्मचारी देण्याचा निर्णय ही गृह मंत्रालयाने दिला असून लवकरच आता खर्डा पोलीस स्टेशन कार्यान्वित होतील यामुळे जामखेड तालुक्यातील गावांची संख्या मोठी असल्याने वेळा खर्डा पोलिस स्टेशनची मागणी अनेक वर्षेपासून होत होती, बीड,उस्मानाबाद व अहमदनगर या तीन जिल्ह्याच्या सरहद्दीवर खर्डा भाग येत होता दुसऱ्या जिल्यातील अनेक चोऱ्याचे प्रमाण या भागात सुध्दा होत होत्या तपासा अभावी  अनेक कामांमध्ये समस्या निर्माण होत होत्या मात्र आता जामखेड तालुक्यांचे पोलिस स्टेशनचे विभाजन झाल्याने याबाबत हद्द निश्चितिचा प्रस्ताव पोलिस महासंचालकांनी शासनास तात्काळ सादर करण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत,तसेच येणाऱ्या पोलिस स्टेशन करिता  होणारा आवर्ती खर्च व अनावर्ती खर्च पोलीस अधीक्षक अहमदनगर  कार्यालयास  मंजूर झालेल्या अनुदानातून करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत, खर्डा येथे पोलीस ठाण्याच्या  माध्यमातून सहाय्यक पोलीस निरीक्षक एक,पोलीस निरीक्षक एक,सहाययक उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्ष तीन, पोलीस हवालदार सहा, पोलीस नाईक  नऊ  तर पोलीस शिपाई पंधरा मध्ये असे एकूण 35 पोलिसांचा स्टॉप खर्डा पोलीस स्टेशन करिता मिळणार आहे असे मोठे पोलीस बळ मिळाल्याने खर्डा भागातील नागरिकांच्या गुन्ह्याच्या संदर्भातील समस्या दूर होणार आहेत.या बाबत आमदार रोहित पवार यांनी येथील नागरिकांची गरज तसेच अनेक वर्षांच्या मागणीचा विचार करून व राजकीय कौशल्य वापरून खर्डेकराना निवडणुकीत दिलेल्या शब्दाचे पालन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here