जामखेडच्या लेकाने गाजवली आशिया! शिऊरच्या सुजय तनपुरेची कुस्तीत सुवर्ण भरारी ८ सुवर्णांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा डंका! गुणवंत क्रीडारत्न पुरस्कार प्रदान
८ सुवर्णांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा डंका! गुणवंत क्रीडारत्न पुरस्कार प्रदान
ग्रामीण भागातूनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडू शकतात हे जामखेड तालुक्यातील शिऊर येथील सुजय नागनाथ तनपुरे याने सिद्ध करून दाखवले आहे. फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात त्याने आजपर्यंत ८ सुवर्ण आणि १ रौप्य पदकासह तब्बल ३ आंतरराष्ट्रीय पदके पटकावून भारताचे आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. जामखेडचे कुस्तीपटू पै. सुजय तनपुरे यांना क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा खेळाडू पुरस्कार पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आला
सुजय हा सध्या मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल, पुणे येथे सराव करत आहे.
त्याची थक्क करणारी कामगिरी:
२०२३ – सुवर्ण वर्षाची सुरुवात: या वर्षी त्याने उत्तर महाराष्ट्र केसरी (65 kg) मध्ये सुवर्ण पदक जिंकले. त्यानंतर U-15 राष्ट्रीय स्पर्धा रोहतक, U-15 Grand Prix गोंडा (उत्तर प्रदेश) आणि सर्वात मोठी कामगिरी म्हणजे U-15 Asian Wrestling Championship, अमान, जॉर्डन येथे 68 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले.
२०२५ – राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय झेप U-17 Khelo India National Wrestling, बिहार आणि U-17 National Championship, पलवल येथे सुवर्ण. याच जोरावर त्याची Asian Championship साठी निवड झाली. त्यानंतर Asian Freestyle Wrestling Championship, Vietnam मध्ये सहभाग आणि Asian Beach Wrestling Championship, Vietnam (70 kg) मध्ये पुन्हा सुवर्ण पदक.
२०२६ – आशियाई युवा स्पर्धेत चमक अलीकडेच झालेल्या Asian Youth Games, Bahrain येथे 70 किलो गटात त्याने रौप्य पदक पटकावून देशाची मान उंचावली.
एकूण कामगिरी सुवर्ण पदके – ८, रौप्य – १, आंतरराष्ट्रीय पदके – ३. राष्ट्रीय स्तरावरील अनेक सुवर्ण पदके आणि भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व.
या दैदिप्यमान कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून, आगामी प्रवरा क्रीडारत्न सन्मान सोहळा २०२६-२७ मध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान संपन्न झाला