“गोविंदा आला रे आला!” जयघोषाने सनराईज् शैक्षणिक संकुल दुमदुमला, दहीहंडी उत्सवात विद्यार्थ्यांचा जल्लोष
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर सनराईज् शैक्षणिक संकुल, पाडळी येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्यांची रुजवणूक व्हावी तसेच भारतीय सण-परंपरांची माहिती नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
दहीहंडीच्या मुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रात गोविंदांनी एक उत्साह निर्माण केला होता. त्याच अनुषंगाने जामखेड तालुक्यातील सनराईज् शैक्षणिक संकुल पाडळी येथेही संकुलातील इंग्लिश मीडियम स्कूल व माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज च्या मुला-मुलींनी मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडून दहीहंडी उत्सव साजरा केला.
आपल्या संकुलातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह कलागुणांना वाव देण्यासाठी व व्यक्तीमत्त्व विकासासाठी नेहमीच विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक तसेच आरोग्य विषयी कार्यक्रम घेणाऱ्या सनराईज शैक्षणिक संकुल पाडळी या संस्थेच्या संकुलात दहीहंडीचा सणाच्या मुहूर्तावर मुले व मुली यांची स्वतंत्र दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी मुलांचा उत्साह पाहून उपस्थितांचे मने भारावून गेली.
यावेळी कार्यक्रमासाठी सनराईज् शैक्षणिक संकुलाच्या संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या अस्मिता जोगदंड व संचालक तेजस दादा भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुनील घाडगे व विवेक सातपुते यांनी मुलांची व तर मुलींची दहीहंडी शिक्षिका सानिया सय्यद,अंजली कात्रजकर, प्रतिभा कदम, सुरेखा घाटुळे पुनम होगले,राजश्री खैरे,यांच्या विशेष परिश्रमातून हा उत्सव साजरा करण्यात आला, या वेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या उत्सावात सहभागी झाले होते.
अशा कार्यक्रमांमधून मुलांचा व्यक्तिमत्व विकास तर होतोच मात्र त्यांना आपल्या भारतीय संस्कृतीची ही माहिती होते व जाणीव राहते. याच हेतूने सनराईज् शैक्षणिक संकुलात वर्षभर विविध महापुरुष यांची जयंती व पुण्यतिथी उत्सव साजरी केली जातात. तसेच आपल्या भारतीय संस्कृतीचे विविध सण उत्सव साजरे केले जातात. यातून मुलांना आनंदही मिळतो. अशा भावना संस्थेच्या सचिवा तथा प्राचार्या अस्मिता जोगदंड यांनी यावेळी व्यक्त केल्या.