Thursday, September 3, 2026
Home ताज्या बातम्या अहिल्यानगर जिल्हा कारागृहात महाराष्ट्र कारागृह ध्वज दिन उत्साहात साजरा देशभक्तीपर...

अहिल्यानगर जिल्हा कारागृहात महाराष्ट्र कारागृह ध्वज दिन उत्साहात साजरा देशभक्तीपर गीतांनी कारागृह परिसर दुमदुमला, बंद्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा उपक्रम

0
2
अहिल्यानगर जिल्हा कारागृहात महाराष्ट्र कारागृह ध्वज दिन उत्साहात साजरा   देशभक्तीपर गीतांनी कारागृह परिसर दुमदुमला, बंद्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा उपक्रम

जामखेड न्युज – – – – – 

अहिल्यानगर जिल्हा कारागृहात महाराष्ट्र कारागृह ध्वज दिन उत्साहात साजरा

देशभक्तीपर गीतांनी कारागृह परिसर दुमदुमला, बंद्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा उपक्रम

कारागृह विभागाच्या ‘सुधारणा व पुनर्वसन’ या ब्रीदवाक्याचा उद्देश साध्य करण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा कारागृह प्रशासनाच्या वतीने बंद्यांसाठी विविध सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याच अनुषंगाने दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा विभागाचा ‘कारागृह ध्वज दिन’ अहिल्यानगर जिल्हा कारागृहात उत्साहात साजरा करण्यात आला.

अहिल्यानगर जिल्हा कारागृह व आर्ट ऑफ लिव्हिंग, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून बंद्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे, राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणे तसेच त्यांच्या मनपरिवर्तनास हातभार लावणे, हा उद्देश ठेवण्यात आला होता.

या कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध गायक व गिटारवादक गिरीराज जाधव, प्रसिद्ध गायक व पियानोवादक नरेंद्र साळवे तसेच उत्तम तबला वादक सार्थक डावरे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. त्यांच्या सादरीकरणाला बंद्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रसिद्ध गायकांच्या सुमधुर आवाजातील देशभक्तीपर गीतांसह भक्तिगीतांनी कारागृह परिसर देशभक्तीमय वातावरणाने भारून गेला.

या सांस्कृतिक कार्यक्रमात कारागृहात कर्तव्य बजावणाऱ्या वरिष्ठ लिपिक श्रीमती सुनिता धर्माधिकारी यांनीही विशेष सहभाग नोंदवत देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.

यावेळी कारागृह अधीक्षक श्री. संतोष कवार यांनी बंद्यांना मार्गदर्शन करताना कारागृहातील बंद्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त करण्यासाठी तसेच त्यांच्या मनामध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची अत्यंत गरज असल्याचे सांगितले. त्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे तसेच इतर उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमास आर्ट ऑफ लिव्हिंग, अहिल्यानगरचे सुभाष गाडे यांच्यासह कारागृह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान बंद्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सांस्कृतिक उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला.

हा उपक्रम मा. डॉ. सुहास वाके (भा.पो.से.), अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संकल्पनेतून तसेच मा. श्री. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि श्रीमती अरुणा मुगुटराव, कारागृह उपमहानिरीक्षक, नाशिक विभाग, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी श्री. विजय सोलंके, तुरुंगाधिकारी श्रेणी-१, वैद्यकीय अधिकारी श्रीमती सुजाता सानप, सुभेदार संजय शिंदे, हवालदार सुनील विधाते, गणेश बेरड, सूर्यकांत ठोंबरे, संदीप जन्हाड, राहुल पठारे, नंदकुमार शिंदे, श्रीकांत गोरगावडे, किरण ढमाले, चंद्रशेखर आठरे, करण बांदे, श्रीमती माधुरी धनाड, श्रीमती समिंद्रा पवार तसेच इतर कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कारागृह ध्वज दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे बंद्यांना सुधारणा, सकारात्मक विचार आणि पुनर्वसनाच्या दिशेने प्रेरणा मिळण्यास मदत झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!