Home शैक्षणिक बातम्या बांधखडक येथे शिष्यवृत्तीधारक रविराज वारे व पवनराज कुत्तरवाडे यांचा स्वातंत्र्यदिनी ११,४०० रुपयांच्या...

बांधखडक येथे शिष्यवृत्तीधारक रविराज वारे व पवनराज कुत्तरवाडे यांचा स्वातंत्र्यदिनी ११,४०० रुपयांच्या रोख पारितोषिकाने सन्मान चैतन्य कुलकर्णी, पोपट काळे यांची प्रमुख उपस्थितीत रविराज-पवनराजच्या यशाला सन्मानाची सलामी

0
8
बांधखडक येथे शिष्यवृत्तीधारक रविराज वारे व पवनराज कुत्तरवाडे यांचा स्वातंत्र्यदिनी ११,४०० रुपयांच्या रोख पारितोषिकाने सन्मान   चैतन्य कुलकर्णी, पोपट काळे यांची प्रमुख उपस्थितीत रविराज-पवनराजच्या यशाला सन्मानाची सलामी

जामखेड न्युज – – – – – – 

बांधखडक येथे शिष्यवृत्तीधारक रविराज वारे व पवनराज कुत्तरवाडे यांचा स्वातंत्र्यदिनी ११,४०० रुपयांच्या रोख पारितोषिकाने सन्मान

चैतन्य कुलकर्णी, पोपट काळे यांची प्रमुख उपस्थितीत रविराज-पवनराजच्या यशाला सन्मानाची सलामी

स्वतंत्र भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांधखडक केंद्र नायगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ ‘काजवा’ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक तथा पूर्व शिक्षणाधिकारी पोपट श्रीराम काळे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि.१५ऑगस्ट २०२६ उत्साहात संपन्न झाला.


इयत्ता ८वी शिष्यवृत्ती तसेच एन.एम.एम.एस.या दोन्ही स्पर्धा परीक्षांत तब्बल ६३,०००रू.ची शासकीय शिष्यवृत्ती जाहीर झालेल्या न्यू इंग्लिश स्कूल खर्डा येथे सध्या इ.९वीत शिक्षण घेत असलेल्या गावातील पवन काशीनाथ कुत्तरवाडे या विद्यार्थ्याच्या हस्ते शालेय ध्वजारोहण करण्यात आले,तर इ.४थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत समाविष्ट झालेल्या बांधखडक शाळेतील रविराज जयकुमार वारे या विद्यार्थ्याने उत्कृष्ट संचलन केले.या दोन्ही शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत बांधखडकच्या वतीने सरपंच राजेंद्र कुटे यांनी प्रत्येकी २१००रू,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नितीन वारे यांच्या वतीने प्रत्येकी २५००रू.तर माजी सरपंच केशव वनवे यांच्या वतीने प्रत्येकी ११००रू.असे एकूण ११,४००रू.रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

सार्थक वनवे, सार्थक लंगडे, गौरव अडागळे व साहील पवार या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विशद केले,तर इ.३रीच्या अक्षरा जाधव या विद्यार्थीनीने ‘आई’ या विषयावर केलेल्या अप्रतिम निबंध वाचनाने सर्वांच्याच डोळ्यांत अश्रू तरळले.अनिकेत उबाळे याने ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारख्या’ या कवितेचे सादरीकरण केले,तर अमृता दराडे हिने राष्ट्रमाता जिजाऊंचे वेशभूषा सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली.वैयक्तिक सादरीकरण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ग्रामीण साहित्यिक परशुराम नागरगोजे यांनी ऊसतोड मजुरांच्या जीवनावर आधारित स्वलिखित ‘पाचाट’ ही कादंबरी भेट दिली.

यावेळी देशभक्तीपर गीतावर विद्यार्थ्यांनी सादर केलेला लेझीम नृत्याविष्कार उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध करून गेला.बक्षीसरूपाने शिक्षणप्रेमी दानशूर नागरिकांनी तब्बल २७,०००रू.शाळेला प्रदान केले,तर पूर्व शिक्षणाधिकारी पोपट काळे यांनी सुमारे ७०००रू.ची पुस्तके शालेय ग्रंथालयासाठी सप्रेम भेट दिली.यावेळी ग्रामविकास अधिकारी संघटना अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष युवराज पाटील यांच्या सौजन्याने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा, शासकीय चित्रकला स्पर्धा तसेच विविध प्रज्ञा शोध स्पर्धा यांतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना एकूण ५० ‘केशर आंब्याची रोपे’ प्रदान करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय जलतरणपटू व गिर्यारोहक चैतन्य विश्वास कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील जीवघेणा अपघात ते विविध जागतिक पातळीवरील जलतरण स्पर्धांतील तसेच गिर्यारोहण क्षेत्रातील चित्तथरारक अनुभव सांगताना जीवनाच्या यशस्वितेसाठी जिद्द व सकारात्मकतेचे अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केले.नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ गेम्समध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत पाचवा क्रमांक आल्याबद्दल तसेच जपानमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चैतन्य कुलकर्णी यांचा बांधखडकवासियांच्या वतीने भव्य सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
अध्यक्षीय मनोगतातून पूर्व शिक्षणाधिकारी ‘काजवा’कार पोपट काळे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षणप्रेमी दानशूर ग्रामस्थांचे कौतुक केले आणि आपल्या ओघवत्या संवाद कौशल्यातून सर्व उपस्थितांना अनमोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमानंतर प्रमोद वारे, अमोल वारे, भारत वारे, रमेश वारे,नंदुलाल वारे, अशोक कदम व शुभम घोडके यांच्या वतीने सर्वांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.
प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मनोहर इनामदार , स्वागतगीत शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा रूपाली घोडके,आभार प्रदर्शन उपक्रमशील शिक्षक नितीन घालमे यांनी तर सूत्रसंचालन संस्कृती जोशी हिने केले.संस्कृतिला समिक्षा घोडके, नयना जावळे व प्रिती नन्नवरे या माजी विद्यार्थिनींनी उत्कृष्ट साथ दिली.स्वातंत्र्यदिन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयकुमार वारे यांच्यासह सर्व पालक व शिक्षक वृंद, ग्रामस्थ, आजी माजी विद्यार्थी आणि माता पालक सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!