Friday, August 14, 2026
Home ताज्या बातम्या देवदैठणमधील २० कुटुंबांच्या रस्त्याचा प्रश्न; तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपोषण दुसर्‍या दिवशी मागे ...

देवदैठणमधील २० कुटुंबांच्या रस्त्याचा प्रश्न; तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपोषण दुसर्‍या दिवशी मागे प्रशासनाकडून मागण्यांचा योग्य व कायदेशीर विचार करण्याचे आश्वासन

0
2
देवदैठणमधील २० कुटुंबांच्या रस्त्याचा प्रश्न; तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपोषण दुसर्‍या दिवशी मागे   प्रशासनाकडून मागण्यांचा योग्य व कायदेशीर विचार करण्याचे आश्वासन

जामखेड न्युज – – – – – 

देवदैठणमधील २० कुटुंबांच्या रस्त्याचा प्रश्न; तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपोषण दुसर्‍या दिवशी मागे

प्रशासनाकडून मागण्यांचा योग्य व कायदेशीर विचार करण्याचे आश्वासन

तालुक्यातील मौजे देवदैठण येथील सुमारे २० कुटुंबांच्या वस्ती व शेतीच्या वहिवाटीसाठी असलेल्या सार्वजनिक रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेले उपोषण दुसर्‍या दिवशी तहसीलदारांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे.

यावेळी तहसीलदार धनंजय बांगर यांनी
लेखी आश्वासन दिले यावेळी मंडलाधिकारी शिरसाट, उपोषणस्थळी माजी सभापती डॉ भगवानराव मुरूमकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगेश आजबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, अजय काशिद, बबन काका काशिद, सचिन घुमरे, अॅड हर्षल डोके, चिराग आजबे, सरपंच अनिल भोरे, कॅप्टन लक्ष्मण भोरे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

देवदैठण येथील विकास बापू भोरे व सर्व शेतकरी बांधव, महिला तसेच वस्तीतील नागरिकांनी या प्रश्नासंदर्भात तहसीलदार, जामखेड यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. सार्वजनिक रस्त्यावर निर्माण झालेली अडचण दूर करून वस्तीतील नागरिक व शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी रस्ता खुला करून द्यावा, अशी त्यांची प्रमुख मागणी होती.

या मागणीसाठी संबंधितांनी १३ ऑगस्ट २०२६ पासून उपोषण सुरू केले होते. याबाबत तहसीलदार कार्यालयाकडून १४ ऑगस्ट रोजी संबंधित उपोषणकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात आली. त्यांच्या मागण्यांबाबत योग्य व कायदेशीर विचार करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

तसेच संबंधितांच्या मागण्यांवर कार्यवाही करताना कोणत्याही प्रकारची अडचण अथवा बाधा निर्माण होणार नाही, याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रशासनाच्या या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेत प्रशासनास सहकार्य करण्याचे मान्य केले.

देवदैठण येथील २० कुटुंबांच्या वस्ती व शेतीच्या वहिवाटीचा रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने प्रशासनाच्या आश्वासनानंतर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता या प्रश्नावर प्रत्यक्ष कायदेशीर कार्यवाही होऊन रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

यावेळी आश्रु बनकर, भीमराव बनकर, खंडू बनकर, मोहन बनकर, वामन बनकर, रघुनाथ बनकर, लिलाबाई बनकर, सुवर्णा बनकर, कांताबाई बनकर, हिराबाई भोरे, निर्मला भोरे, लक्ष्मी भोरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व महिला उपोषण कर्ते उपस्थित होते.

उपोषण सुटल्यावर मंगेश आजबे यांच्या तर्फे सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!