Home ताज्या बातम्या पाच दिवसांत ऐतिहासिक निकाल! निवृत्त शिक्षक-कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा काल्पनिक वेतनवाढीचा...

पाच दिवसांत ऐतिहासिक निकाल! निवृत्त शिक्षक-कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा काल्पनिक वेतनवाढीचा मार्ग मोकळा; जामखेडमधील १०० तर आष्टीतील ३८ अशा १३८ निवृत्त शिक्षक-कर्मचाऱ्यांना लाभ

0
5
पाच दिवसांत ऐतिहासिक निकाल! निवृत्त शिक्षक-कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा  काल्पनिक वेतनवाढीचा मार्ग मोकळा; जामखेडमधील १०० तर आष्टीतील ३८ अशा १३८ निवृत्त शिक्षक-कर्मचाऱ्यांना लाभ

जामखेड न्युज – – – – – 

पाच दिवसांत ऐतिहासिक निकाल! निवृत्त शिक्षक-कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा

काल्पनिक वेतनवाढीचा मार्ग मोकळा; जामखेडमधील १०० तर आष्टीतील ३८ अशा १३८ निवृत्त शिक्षक-कर्मचाऱ्यांना लाभ

सेवानिवृत्त माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक काल्पनिक वेतनवाढ (Notional Increment) देण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे जामखेड तालुक्यातील सुमारे १००, तर आष्टी तालुक्यातील ३८, अशा एकूण १३८ निवृत्त माध्यमिक शिक्षक-कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळातील शेवटच्या वेतनवाढीचा लाभ मिळावा, यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेवर अवघ्या पाच दिवसांत सुनावणी होऊन निकाल लागल्याने संबंधित शिक्षक-कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. युवराज काकडे-पाटील यांनी बाजू मांडली. याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने संबंधित नियम व यापूर्वीच्या न्यायालयीन निर्णयांचा आधार घेत निवृत्त शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या काल्पनिक वेतनवाढीबाबत महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली.

न्यायालयाने स्पष्ट केले की, ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वी आवश्यक कालावधीची सेवा पूर्ण केलेली आहे, त्यांना पुढील १ जुलैची वार्षिक वेतनवाढ मिळण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचा मुद्दा विचारात घेण्यात आला. या निर्णयामुळे संबंधित निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन व इतर आर्थिक लाभांवरही सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

या निर्णयासाठी न्यायालयाने महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम २००९ मधील नियम १०, तसेच यापूर्वीच्या विविध न्यायालयीन निर्णयांचा आधार घेतल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या Director (Admin & HR), KPTCL विरुद्ध C.P. Mundinamani या प्रकरणातील ऐतिहासिक निर्णयाचाही संदर्भ या प्रकरणात घेण्यात आला.

याचिका दाखल झाल्यानंतर अल्पावधीतच सुनावणी होऊन निकाल लागल्याने जामखेड व आष्टी तालुक्यातील निवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला न्यायालयीन निर्णयामुळे मोठे बळ मिळाले आहे.

या प्रकरणासाठी ॲड. युवराज काकडे-पाटील यांनी केलेल्या कायदेशीर पाठपुराव्याबद्दल निवृत्त शिक्षक-कर्मचाऱ्यांनी विशेष आभार व्यक्त केले. शिवाजीभाऊ ढाळे, रमेश अडसूळ, दिलीप ढवळे , तसेच गहिनीनाथ काकडे यांच्यासह संबंधित शिक्षक-कर्मचाऱ्यांनी ॲड. काकडे-पाटील यांचे अभिनंदन केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!