ल. ना. होशिंग विद्यालयात लेखन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये लेखन व वक्तृत्वाची जागवली प्रेरणा दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रेरणादायी उपक्रम
ल. ना. होशिंग विद्यालयात लेखन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये लेखन व वक्तृत्वाची जागवली प्रेरणा
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रेरणादायी उपक्रम
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये लेखन, वाचन, विचारमंथन आणि वक्तृत्वाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
संस्थेचे अध्यक्ष उद्धवबापू देशमुख, सचिव अरुणशेठ चिंतामणी, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सहसचिव डॉ. सुनील कटारिया, खजिनदार शरद देशमुख, माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी खजिनदार राजेश मोरे तसेच प्राचार्य बी. ए. पारखे, उपप्राचार्य युवराज भोसले आणि उपमुख्याध्यापक अनिल देडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक सुदाम वराट, पोपट जगदाळे, नरेंद्र डहाळे, स्वप्निल जाधव, निलेश भोसले (लंघे पी.टी.) यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच परीक्षक म्हणून श्रीमती घाडगे एस. डी. आणि श्रीमती जगदाळे एस. डी. यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे परीक्षण केले.
कार्यक्रमाची सुरुवात चिमुकल्या शौर्य पवार याच्या प्रभावी भाषणाने झाली. त्याच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
त्यानंतर रूपाली शेंबडे, श्रावणी गायकवाड, संग्राम काळंगे, शौर्य बोडखे, गुंजन गायकवाड, ज्ञानेश्वर रेडे, प्राजंली जगदाळे, अनुष्का नेमाडे, आराध्य कासार, दुर्गा सरडे, श्रेयशी साखरे आणि ईश्वरी नागरगोजे यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रेरणादायी विषयांवर प्रभावी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या विचारमंथन, आत्मविश्वास आणि प्रभावी अभिव्यक्तीचे उपस्थितांनी कौतुक केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये लेखन, वाचन, भाषणकला आणि सर्जनशील विचारांची प्रेरणा निर्माण झाली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळत असून, भविष्यातही अशा विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पोपट जगदाळे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट जगदाळे यांनी केले, तर पर्यवेक्षक सुदाम वराट यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, परीक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.