“गुरुपौर्णिमा हा केवळ सण नसून गुरूंप्रती आदर, कृतज्ञता आणि श्रद्धा व्यक्त करण्याचा दिवस आहे,” असे सांगितले. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी गुरूची जागा कोणीही घेऊ शकत नाही असे मत संस्थेचे माजी सचिव शशिकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. भारतीय संस्कृतीतील गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमात गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उद्धवबापू देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी खजिनदार राजेश मोरे, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, माजी मुख्याध्यापक रमेश अडसूळ, माजी प्राचार्य सादिक शेख, रमेश चौधरी, सुभाष घुले, गाडे मॅडम, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष अरुण हेंद्रे, आबासाहेब वीर, राजकुमार थोरवे, उदयकुमार दहितोडे, दिलीप परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गुरुपूजनाने झाली. विद्यार्थी श्रेयशी साखरे, प्रणव वारे तसेच ह.भ.प. ईश्वरी नागरगोजे यांनी गुरुमहिमा अधोरेखित करणारी मनोगते व सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक अनिल देडे यांनी करताना विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच संस्था चालक व शिक्षकांच्या सहकार्याने तालुक्यातील एकमेव अ प्लस श्रेणी प्राप्त विद्यालय मिळाली गुरू पौर्णिमा उपक्रमाबद्दल माहिती दिली.
यावेळी शिक्षक पोपट जगदाळे यांनी गुरू-शिष्य नात्याचे महत्त्व स्पष्ट करताना गुरू हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा दीपस्तंभ असल्याचे सांगितले. गुरूंकडून मिळणारे संस्कार, मूल्ये आणि ज्ञान हीच विद्यार्थ्यांच्या यशाची खरी पायाभरणी असल्याचे त्यांनी नमूद केले.
माजी प्राचार्य अनंता खेत्रे यांनी अशा कार्यक्रमांचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे हा असल्याचे सांगितले. स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या गुरू-शिष्य नात्याचा दाखला देत, गुरूची शिकवण आयुष्यभर उपयोगी पडते, असे प्रतिपादन त्यांनी केले.
माजी सचिव शशिकांत देशमुख यांनी पुढे बोलताना सांगितले की, गुरू विद्यार्थ्यांची क्षमता ओळखून त्यांना योग्य दिशा देतात. शिल्पकार जसा दगडातून सुंदर मूर्ती घडवतो, त्याचप्रमाणे गुरू शिष्याच्या जीवनातील अंधकार आणि गर्व दूर करून त्याचे व्यक्तिमत्त्व घडवतात, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात उद्धवबापू देशमुख यांनी भारतीय संस्कृतीतील गुरू-शिष्य नाते हे अत्यंत पवित्र आणि आदर्श असल्याचे सांगितले. ज्ञान, संस्कार आणि चारित्र्यनिर्मितीमध्ये गुरूंचे योगदान अनमोल असून विद्यार्थ्यांनी गुरूंच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन जीवनात यशस्वी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष उद्धवबापू देशमुख, सचिव अरुणशेठ चिंतामणी, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सहसचिव डॉ. सुनील कटारिया, खजिनदार शरद देशमुख, माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी खजिनदार राजेश मोरे तसेच प्राचार्य बी. ए. पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक अनिल देडे, पर्यवेक्षक सुदाम वराट, पोपट जगदाळे, मुकूंद राऊत, नरेंद्र डहाळे, राघवेंद्र धनलगडे, विशाल पोले, किशोर कुलकर्णी, रोहित घोडस्वार, उमाकांत कुलकर्णी, बाबासाहेब समुद्र, आदित्य देशमुख, कैलास वराट, विजय क्षीरसागर, हनुमंत वराट, लक्ष्मण सोळंकी, स्वप्निल जाधव, बापू जरे, गणेश नेटके, साई भोसले, लंघे पी. टी., संगीता दराडे, सुप्रिया घायतडक, वंदना अल्हाट, स्वप्नाली घाडगे, पूजा भालेराव, प्रियंका सुपेकर, आर. एस. कारंडे, एस. बी. हंगे, एम. जे. जाधव, एस. डी. जगदाळे, एस. व्ही. भोंडवे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया घायतडक व प्रियंका सुपेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक सुदाम वराट यांनी मानले. गुरूंच्या ऋणाची जाणीव करून देणारा हा प्रेरणादायी सोहळा विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.