Tuesday, September 15, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडच्या ल. ना. होशिंग विद्यालयाचा कुस्तीच्या आखाड्यात दणदणीत जलवा! तालुकास्तरीय...

जामखेडच्या ल. ना. होशिंग विद्यालयाचा कुस्तीच्या आखाड्यात दणदणीत जलवा! तालुकास्तरीय पावसाळी कुस्ती स्पर्धेत तब्बल १० खेळाडूंची प्रथम क्रमांकावर बाजी, उत्कृष्ट कामगिरीने विद्यालयाचे नाव उज्ज्वल

0
2
जामखेडच्या ल. ना. होशिंग विद्यालयाचा कुस्तीच्या आखाड्यात दणदणीत जलवा!   तालुकास्तरीय पावसाळी कुस्ती स्पर्धेत तब्बल १० खेळाडूंची प्रथम क्रमांकावर बाजी, उत्कृष्ट कामगिरीने विद्यालयाचे नाव उज्ज्वल

जामखेड न्युज – – – – – 

जामखेडच्या ल. ना. होशिंग विद्यालयाचा कुस्तीच्या आखाड्यात दणदणीत जलवा!

तालुकास्तरीय पावसाळी कुस्ती स्पर्धेत तब्बल १० खेळाडूंची प्रथम क्रमांकावर बाजी, उत्कृष्ट कामगिरीने विद्यालयाचे नाव उज्ज्वल

 

पावसाळी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेअंतर्गत झालेल्या कुस्ती स्पर्धेत जामखेड येथील दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे.

विद्यालयाच्या विविध वयोगटांतील तब्बल दहा खेळाडूंनी आपल्या गटात प्रथम क्रमांक पटकावत दमदार कामगिरी केली. या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

१४ वर्षे वयोगटात महेश्वर बारगजे याने ३५ किलो वजनी गटात, तर ओमकार दराडे याने ४८ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला.
१७ वर्षे वयोगटात वैभव वनवे (४५ किलो), सौरभ उपाशे (४८ किलो), अर्जुन फटांगडे (६५ किलो), यश देडे (७१ किलो) आणि राज अवसरे (७४ किलो) यांनी आपल्या-आपल्या वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.

तसेच गिरकोरोमन १७ वर्षे वयोगटात ओम खरात (४५ किलो), संग्राम जाधव (४८ किलो) आणि विष्णू दराडे (५५ किलो) यांनी प्रथम क्रमांक पटकावत विद्यालयाच्या यशात भर घातली.

या सर्व खेळाडूंनी प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि उत्कृष्ट तंत्राच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत आपले कौशल्य सिद्ध केले. त्यांच्या या यशामागे पै. बापू जरे, राघवेंद्र धनलगडे, प्रल्हाद साळुंके आणि धीरज (बंटी) पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

कुस्तीपटूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, सचिव अरुणशेठ चिंतामणी, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सहसचिव डॉ. सुनील कटारिया, माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी खजिनदार राजेश मोरे यांच्यासह सर्व संचालक मंडळाने यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

तसेच प्राचार्य बी. ए. पारखे, उपप्राचार्य युवराज भोसले, उपमुख्याध्यापक अनिल देडे, पर्यवेक्षक सुदाम वराट यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे कौतुक करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत केलेल्या या दमदार कामगिरीमुळे ल. ना. होशिंग विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!