आषाढी एकादशीनिमित्त श्री साकेश्वर विद्यालय साकतची दिंडी भक्तिमय वातावरणात संपन्न ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त स्वागताने परिसर दुमदुमला; वारकरी वेषातील विद्यार्थ्यांनी सादर केले अभंग व भक्तिगीते
आषाढी एकादशीनिमित्त श्री साकेश्वर विद्यालय साकतची दिंडी भक्तिमय वातावरणात संपन्न
ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त स्वागताने परिसर दुमदुमला; वारकरी वेषातील विद्यार्थ्यांनी सादर केले अभंग व भक्तिगीते
आषाढी एकादशीनिमित्त दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे श्री साकेश्वर विद्यालय, साकत यांच्या वतीने पारंपरिक वारकरी दिंडीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. वारकरी संप्रदायाची परंपरा, संत विचार आणि भक्तीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने काढण्यात आलेल्या या दिंडीचे ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले.
वारकरी वेष परिधान केलेल्या विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे दिंडीला विशेष आकर्षण प्राप्त झाले. टाळ-मृदुंगाच्या गजरात “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी विविध अभंगांना वेगवेगळ्या चालींमध्ये सादर करत संत परंपरेचा आणि वारकरी संस्कृतीचा सुंदर आविष्कार घडविला. यामुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
दिंडीचे स्वागत करण्यासाठी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, सरपंच मनिषा पाटील, माजी सरपंच कांतीलाल वराट, उपसरपंच राजुभाऊ वराट, सर्जेराव पाटील, ज्ञानदेव मुरूमकर, डॉ. अजय वराट, हनुमंत वराट, गणेश वराट, रोहित घोडस्वार, दत्ता मोरे, केशव मोरे, बाळू सानप, उर्मिला मुरूमकर, मीराबाई वराट, अलका वराट, आशाताई मुरूमकर, अश्विनी दळवी, गंगूबाई वराट यांच्यासह गावातील अनेक महिला व नागरिकांनी दिंडीचे स्वागत केले सर्वांनी फुलांची उधळण करून आणि जयघोष करत दिंडीचे उत्साहात स्वागत केले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक भरत लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, सचिन वराट, मुकुंद वराट, प्रसाद होशिंग, सागर पवार, ज्योती लहाने, अतुल दळवी, आण्णा विटकर, आश्रु सरोदे यांच्यासह सर्व विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, संत साहित्याचे महत्त्व, सामाजिक ऐक्य आणि भक्तीचा संदेश प्रत्यक्ष अनुभवातून मिळाला. ग्रामस्थांनी विद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचे जतन करणारे उपक्रम सातत्याने आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.