Home ताज्या बातम्या संध्याताई सोनवणे यांच्या संकल्पनेतून तालुकाभर ‘दादांची प्रतिमा’ अभियान, शाळा व शासकीय...

संध्याताई सोनवणे यांच्या संकल्पनेतून तालुकाभर ‘दादांची प्रतिमा’ अभियान, शाळा व शासकीय कार्यालयांना प्रतिमांचे वितरण

0
4

जामखेड न्युज – – – – 

संध्याताई सोनवणे यांच्या संकल्पनेतून तालुकाभर ‘दादांची प्रतिमा’ अभियान,

शाळा व शासकीय कार्यालयांना प्रतिमांचे वितरण

स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विचार, कार्य आणि महाराष्ट्राच्या विकासातील योगदान समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावे, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा तथा जिल्हा नियोजन समिती, अहिल्यानगर यांच्या सदस्या कु. संध्याताई सोनवणे यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील सर्व शाळा तसेच विविध शासकीय कार्यालयांना दादांच्या प्रतिमांचे वितरण करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री शुभम जाधव होते. प्रमुख उपस्थितीमध्ये गटशिक्षणाधिकारी श्री धनंजय बोराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक श्री महेश निमोणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बापूसाहेब शिंदे, गणेशजी काळे, मनसे नेते श्री सनी सदाफुले, सहायक गटविकास अधिकारी श्री अमित बोराटे, विस्तार अधिकारी श्री खैरे साहेब, श्री भजनावळे साहेब, कृषी अधिकारी श्री मिसाळ साहेब, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री युवराज पाटील, शिक्षक नेते श्री नारायणजी राऊत, श्री मुकुंदराज सातपुते, श्री केशवराज कोल्हे, श्री संतोष डमाळे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे श्री कोपनर सर, श्री अमोल पवार यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात कु. संध्याताई सोनवणे यांनी शासनाने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचा महापुरुषांच्या अधिकृत जयंती यादीत समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार यांचे आभार व्यक्त केले. जयंतीच्या काळात प्रतिमांची कमतरता भासू नये आणि तालुक्यातील प्रत्येक शाळा, शासकीय कार्यालय तसेच वाडी-वस्तीपर्यंत दादांची प्रतिमा पोहोचून त्यांचे विचार जनमानसात रुजावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गटशिक्षणाधिकारी श्री धनंजय बोराडे यांनी शिक्षण विभागातील सर्व शाळांना प्रतिमा भेट दिल्याबद्दल शिक्षण विभागाच्या वतीने संध्याताई सोनवणे यांचे विशेष आभार मानले. अध्यक्षीय समारोपात गटविकास अधिकारी श्री शुभम जाधव यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या शिस्त, वक्तशीरपणा आणि कार्यतत्परतेचा आदर्श प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि युवकांनी आपल्या जीवनात अंगीकारावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर कोळेकर यांनी केले, तर श्री मनोहर इनामदार यांनी आभार प्रदर्शन केले.

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांचा जागर समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने संध्याताई सोनवणे यांनी राबविलेला हा उपक्रम तालुक्यात विशेष चर्चेचा विषय ठरला असून उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या दूरदृष्टीचे आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!