Tuesday, July 21, 2026
Home ताज्या बातम्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम जामखेड तालुक्यातील जि.प. शाळांमध्ये प्रथमोपचार पेटीचे...

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम जामखेड तालुक्यातील जि.प. शाळांमध्ये प्रथमोपचार पेटीचे होणार वितरण

0
8

जामखेड न्युज – – – – – 

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

जामखेड तालुक्यातील जि.प. शाळांमध्ये प्रथमोपचार पेटीचे होणार वितरण

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने शिवसेना जामखेड तालुक्याच्या वतीने तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना प्रथमोपचार पेटी (फर्स्ट एड बॉक्स) वितरित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शिवसेना महाराष्ट्र राज्याचे पक्ष सचिव राम रेपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त, आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा नेते आकाश बाफना यांच्या संकल्पनेतून आणि सामाजिक कार्यकर्त्या पायलताई बाफना मित्र परिवार यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.


याबाबत माहिती देताना शिवसेना शहरप्रमुख मोहन देवकाते यांनी सांगितले की, २५ जुलैपासून आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर जामखेड शहरासह तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये प्रथमोपचार पेट्यांचे वितरण करण्यात येणार आहे.

शाळांमधील विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत किंवा आपत्कालीन परिस्थितीत तातडीची वैद्यकीय मदत मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबविणारे आकाश बाफना व पायलताई बाफना तसेच त्यांचा मित्रपरिवार सामाजिक बांधिलकी जपत जनहिताचे कार्य करत आहेत.

विद्यार्थ्यांच्या आरोग्य संरक्षणासाठी प्रथमोपचार पेटीचे वितरण हा त्याच सामाजिक उपक्रमांचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रथमोपचार पेटीचे अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख नामदार एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार डोंगरे, ज्येष्ठ नेते कैलास जाधव, पांडुरंग माने, विकी पिंपळे, दत्तात्रय जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

२५ जुलै रोजी होणाऱ्या वितरण कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने तसेच शिवसेनेचे तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार असून, जामखेड तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांपर्यंत प्रथमोपचार पेट्या पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत राबविण्यात येणारा हा उपक्रम सामाजिक क्षेत्रात कौतुकास पात्र ठरत असून, शाळांमध्ये आरोग्यविषयक प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!